Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार असताना इंदापूर तालुक्यात अडीच हजार कोटींची विकासकामे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आणली. मात्र, आता दुसरेच लोक येऊन उद॒घाटन आणि पोस्टरबाजी करत आहेत.
Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका

Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर केली. (BJP leaders have joined the wari because of the election: Supriya Sule)

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना इंदापूर (Indapur) तालुक्यात अडीच हजार कोटींची विकासकामे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आणली. मात्र, आता दुसरेच लोक येऊन उद॒घाटन आणि पोस्टरबाजी करत आहेत. एकीकडे शेतीमालाला भाव नाही, तर दुसरीकडे महागाई कमी झाली नाही. मग पैसा नेमका जातोय कुठे, असा सवाल करत मुख्यमंत्री आता शेती करायला लागले आहेत. त्यांनी आधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले.

Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका
Subhash Deshmukh challenge to Patole : सुभाष देशमुखांचं नाना पटोलेंना आव्हान; ‘माझी इमारत बेकायदेशीर असेल तर तत्काळ पाडा’

इंदापूर तालुक्यातील कळस येथील गावभेट दौऱ्यानिमित्त आलेल्या खासदार सुळे यांनी आपल्या भाषणात भाजप, मुख्यमंत्री यांचा खरपूस समाचार घेत, तरुणी-महिलांना काही सूचना दिल्या. आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील, प्रतापराव पाटील, हनुमंत कोकाटे, डी. एन. जगताप, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, सरपंच सविता सुरेश खारतोडे, उपसरपंच विशाल राजेभोसले आदी उपस्थित होते.

Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका
Dilip Walse Patil News : ...तोपर्यंत माझ्या मनाला आनंद मिळणार नाही; वळसे पाटलांनी व्यक्त केली खंत

वैशाली पाटलांचे कौतुक...

बंद वाड्यातील महिला वैशाली पाटील यांनी वाड्याबाहेर पडून राजकारणात प्रवेश करत लोकांचे प्रश्न सोडविण्याचे धाडस केले. त्यासाठी त्यांचे पती प्रतापराव पाटील यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. आज गावातील ७० टक्क्यांहून अधिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांचा पुढाकार व योगदान महत्वाचे आहे. एवढं सगळं करत असताना आजही त्यांचा पदर डोक्यावर असल्याची बाब उल्लेखनीय आहे, असे सांगत व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील यांचे खासदार सुळे यांनी कौतुक केले.

Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका
Uddhav Thackeray News : मोदी, शहा हे महेबुबा मुफ्तींच्या शेजारी बसले नव्हते काय? : उद्धव ठाकरेंचा भाजपला खडा सवाल

सभेतच वृद्ध महिलेला फोन...

खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना सभेत बसलेल्या एका वृद्ध महिलेला मोबाईलवर कॉल आला. ती महिला मोठ्या आवाजात बोलू लागली, त्यामुळे सुळे यांचे लक्ष त्या महिलेकडे गेले. त्यांनी एक वृद्ध महिला मोबाईलवर बोलत असल्याची बाब उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारच्या काळात मोबाईल आल्यानंतर तो आता प्रत्येकाच्या हातात पोचल्याची बाब समाधानकारक आहे. आपण संसदेच्या सभागृहात ही बाब मांडणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. या वेळी सभेतच त्यांनी महिलेला आलेल्या फोनबाबत विचारपूस केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com