
Pune News : महायुतीचे 100 दिवस होत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे सध्या महायुती बॅकफूटवर गेली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच "100 दिवसात महायुतीची एक विकेट गेली, आता 6 महिने थांबा, दुसरी विकेट पडणार", असा दावा केला आहे. यामुळे सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील महायुती सरकारचे 100 दिवस पूर्ण होत असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. यावेळी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण, स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्कारासह इतर मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. यावेळी विरोधकांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरत सरकारवर हल्लाबोल केला तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून घरली. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने ही मागणी करण्यात आली. त्यानंतर या हत्याप्रकरणातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात एकच असंतोष उसळला ज्यामुळे धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच "100 दिवसात महायुतीची एक विकेट गेली, आता 6 महिने थांबा, दुसरी विकेट पडणार", असा दावा केला आहे. यामुळे सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी हा दावा पुण्यातील पक्षाच्या बैठकीत केला. शिवाय धनंजय मुंडेंवर जहरी टीका करताना, एक विकेट पडलीय, आता सहा महिने थांबा दुसरी आणखी एक पडेल असे म्हटलं आहे.
त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? विरोधकांच्या रडारवर आता कोणता मंत्री आहे? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी, राज्यातील एक मंत्री खूप बोलत असून तो बायकोच्या आड लपून सगळे उद्योग करत असल्याचा दावा केला आहे. हिम्मत असेल, तर त्याने समोर येऊ लढावं. ही लढाई खूप मोठी आहे. हे ‘डबल डेंजर’ आहेत. अशा लोकांशी लढण्यात मजा आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही करताना, ‘बरं झालं आमचा पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, त्या अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही, अशा शब्दात नाव न घेत धनंजय मुंडेंवर जहरी टीका केली आहे. तसेच महायुतीवर निशाना साधताना, महायुतीची 100 दिवसात एक विकेट गेली. आता सहा महिने थांबा आणखी एक विकेट पडेलं.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.