BJP-NCP: महेश लांडगेंचे 22 तारखेसाठी मंगलसंच, तर नाना काटेंकडून अयोध्येतील मंदिराच्या प्रतिकृतींचे वाटप

Mahesh Landge and Nana Kate : भाजपबरोबर राष्ट्रवादीकडूनही मंदिरांची साफसफाई आणि सोमवारच्या श्रीराम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी
Mahesh Landge and Nana Kate
Mahesh Landge and Nana KateSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: अय़ोध्येत श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी देशभर सुरु असून त्यात भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आघाडीवर आहेत. त्याची तयारी म्हणून आठ दिवस अगोदर आपापल्या भागातील मंदिरांची साफसफाई त्यांनी सुरु केली आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी (ता.19) राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) सामील झाल्याने त्याची मोठी चर्चा झाली.

दरम्यान, सोमवारच्या सोहळ्यानिमित्त भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी एक लाख मंगलसंच वाटप सुरु केले असून 96 हजार आतापर्यंत देण्यात आले. तर, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नाना काटे यांनीही यानिमित्त अय़ोध्येतील श्रीराम मंदिराच्या तीस हजार लाकडी प्रतिकृतींचे वाटप चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरु केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahesh Landge and Nana Kate
Rohit Pawar : आजोबांसारखाच रोहित पवारांचा 'कॉन्फिडन्स'; तारखेआधीच ईडीच्या कार्यालयात जाणार ?

तसेच त्यांनी भाजप नेत्यांसारखी आपल्या भागातील राम मंदिरात शुक्रवारी स्वच्छता मोहीम घेतली. राममंदिर हा भाजपचा विषय नसून लोकांची भावना असल्याने मंदिराची साफसफाई केली आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतींचे वाटप करीत आहे, असे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

लांडगेंच्या मंगलसंचात प्रभू श्रीरामांची प्रतिमा, अक्षता, भगवा ध्वज, प्रसाद, घराच्या प्रवेशद्वारावर चिटकवण्यासाठी स्टिकर, रामभक्तांसाठी मफलर, बॅच, भगवी टोपी, पणत्या, तिळगूळ आहे. हा संच देऊन 23 जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी या असे निमंत्रण दिले जात आहे. 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिवाळी साजरी करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार हे संचवाटप केले जात आहे, असे आमदार लांडगे म्हणाले.

या संचाद्वारे नागरिक उत्सव साजरा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याजोडीने प्रभू श्रीराम यांना समर्पित यावर्षाच्या दीड लाख दिनदर्शिकांचे केले असून नव्या वर्षाच्या एक लाख श्रीराममय डायऱ्याही दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चिंचवडला श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे वाटप

अयोध्येतील सोहळ्याचे साक्षीदार होता य़ावे, यासाठी त्यादिवशी रहाटणी-पिंपळे सौदागर येथे नाना काटे यांनी भजन, कीर्तन, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त आज (ता.19) रहाटणीतील श्री राम मंदीर व परिसराची स्वच्छता करून तेथे आरती करण्यात आली.

अयोध्येतील सोहळा तेथे मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, आयोध्येतील श्री राम मंदीराच्या प्रतिकृतीचे अनावरण व पूजन करून त्याचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले. अशा दहा हजार प्रतिकृती दोन-दोन पणत्यांसह वाटण्यात येणार आहेत. त्या सोमवारी करा,असे सांगितले जात आहे.

(Edited by : Ganesh Thombare)

Mahesh Landge and Nana Kate
Ajit Pawar : 'पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला; पण...'; अजित पवारांनी विरोधकांनी सुनावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com