भोसरीत वीज गेली अन् पिंपरी-चिंचवडचा आवाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथमच घुमला...

PCMC|Mahesh Landge|BJP|NCP : पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचे दोन व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक असे तीन आमदार आहेत. मात्र, या अधिवेशनात अद्यापपर्यंत कोणीही सभागृहात बोललेले नव्हते.
MLA Mahesh Landge
MLA Mahesh LandgeSarkarnama

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) भोसरी आणि आकुर्डी भागातील साठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (ता.२३ मार्च) खंडित झाला आणि त्याचे पडसाद लगेचच गुरुवारी (ता.२४ मार्च) थेट विधानसभेत (Maharashtra Assembly) उमटले. यानिमित्ताने का होईना या अधिवेशनात शहराचा आवाज प्रथमच घुमला. उद्योगनगरीतील कालच्या वीजेच्या प्रश्नाची दखल घेण्याचे आदेश पीठासीन अधिकार्यांनी सरकारला दिले.

MLA Mahesh Landge
नीलम गोऱ्हे अन् दरेकरांमध्ये जोरदार खडाजंगी; धमकीच्या भाषेनं सभागृह दणाणलं

कालच्या वीजेच्या खेळखंडोब्याप्रकरणी भोसरीचे भाजप (BJP) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर धरणे धरीत महाविकास आघाडीचा आज सकाळी धिक्कार केला. विधानसभेतही त्यांनी पॉंईट ऑफ इन्फर्मेशनव्दारे हा प्रश्न मांडला. पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा आंदोलन करावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला. या इशारेवजा मागणीचे निवेदन नंतर त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले. शहरात भाजपचे दोन व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक असे तीन आमदार आहेत. मात्र,या अधिवेशनात अद्यापपर्यंत कोणीही सभागृहात बोललेले नव्हते. दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन लक्षवेधी आणि अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होत तीनदा आतापर्यंत सभागृहात जोरदार बॅटिंग केली आहे.

MLA Mahesh Landge
Shrirang Barne : राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेची कामं होत नाहीत...

महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याचा फटका भोसरी एमआयडीसीतील साडेसहा हजार लघुउद्योगांनाही बसला.त्यांचे अंदाजे शंभर कोटीचे नुकसान झाले.ऐन उन्हाळ्यात तीन लाख रहिवाशांची मोठी होरपळ झाली.महावितरण, महापारेषण कर्मचाऱ्यांच्या अत्यंत बेजबाबदार कामामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याकडे लांडगेंनी लक्ष वेधले. दिवसातून दोन-चार वेळा ‘ब्रेकडाऊन’ होत असतो. यामुळे कारखान्यांचे उत्पादन मंदावते. त्याचा विपरित परिणाम शहरातील उद्योगांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. सध्या कडक उन्हाळा असल्याने वीज गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रचंड हात होतात. त्यात वीजपुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने जो संपर्क क्रमांक दिला आहे. तो सतत व्यस्त व नॉटरिचेबल असतो. तसेच महावितरणचे अघिकारी वीज खंडित झाल्यावर उडवा-उडवीचे उत्तर देतात. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.त्यामुळे सरकारने वीज समस्येबाबत ठोस पावले उचलली नाहीत,तर पिंपरी-चिंचवडकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा लांडगेंनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com