आमदार महेश लांडगेंची मलिकांवर टीका करतांना जीभ घसरली; केले वादग्रस्त वक्तव्य

भोसरीचे भाजप (BJP)आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टीका केली आहे.
Mahesh Landge
Mahesh LandgeSarkarnama

पिंपरी : मनी लॉंड्रिंगप्रकरणी 'ईडी'ने (ED) बुधवारी (ता.२३ फेब्रुवारी) अटक केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने (BJP) गुरुवारी (ता.२४ फेब्रुवारी) राज्यभर आंदोलन केले. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) ते शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या नेतृत्वाखाली झाले. देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे लांडगे यावेळी म्हणाले. मलिक यांचा एकेरी तसेच भंगारवाला असा उल्लेख करीत त्यांच्यासह ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

Mahesh Landge
कामठेंचा राजीनामा भाजपच्या जिव्हारी; आगामी निवडणुकीत ठरणार डोकेदुखी...

मलिकचा राजीनामा घेतला, तरी देशवासीय त्याला माफ करणार नाहीत, एवढा गंभीर आणि संतापजनक आरोप त्याच्यावर आहे. मुंबई बॉम्बस्फोट घडवणाऱ्या देशद्रोही दाऊदसाठी तो काम करीत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, असे लांडगे म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांच्यावर दररोज नवनवीन आरोप होत आहेत. त्यांच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. पण, देशद्रोह्याशी सबंध ठेवणाऱ्या मलिकावरील आऱोप त्यापेक्षा गंभीर आणि संतापजनक आहे. त्यामुळे त्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Mahesh Landge
मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा; तिन्ही मागण्या केल्या मान्य

जातीधर्माचे राजकारण करण्याचे काम आघाडीतील तिन्ही पक्ष करतात. मात्र, त्याचा आरोप ते भाजपवर लावतात, असे लांडगे म्हणाले. दाऊद देशाबाहेर पळून जाण्यास कारणीभूत तेच आहेत, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. महापौर माई ढोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे, माजी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, दक्षिण भारत आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, नगरसेविका आरती चोंधे, सागर अंगोळकर, सविता खुळे, योगिता नागरगोजे, निता पाडाळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, तेजस्विनी कदम, नंदू भोगले, संजय पटनी, संजय परळीकर, गणेश वाळुंजकर, आशा काळें आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com