Tushar Kamthe & pcmc Commissioner Rajesh Patil
Tushar Kamthe & pcmc Commissioner Rajesh PatilSarkarnama

कामठेंचा राजीनामा भाजपच्या जिव्हारी; आगामी निवडणुकीत ठरणार डोकेदुखी...

पिंपरी पालिकेतील (PCMC) भ्रष्टाचाराची आणखी काही प्रकरणे पुराव्यांसह बाहेर काढणार असल्याचे तुषार कामठे (Tushar Kamthe) यांनी सांगितले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक (PCMC Election) अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) नगरसेवकांचे राजीनामा सत्र गेल्या आठ दिवसांपासून सुरु झाले आहे. गुरुवारी (ता.२४ फेब्रुवारी) त्यांच्या तुषार कामठे (Tushar Kamthe) या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या तरुण नगरसेवकाने राजीनामा दिला. त्यामुळे आठ दिवसांत राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची संख्या ही तीन झाली आहे. हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. एकाने, तर तो केलाही आहे. हुकूमशाही, भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे कामठेंनी 'सरकारनामा'ला सांगितले. त्यांचा रोख हा शहर कारभारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दिशेने होता. दरम्यान, त्यांचा राजीनामा आगामी पालिका निवडणुकीत भाजपला अडचणीत आणू शकतो.

Tushar Kamthe & pcmc Commissioner Rajesh Patil
भाजपला आठवडाभरात तिसरा धक्का! फडणवीसांनी लक्ष घालूनही गळती थांबेना

विरोधी पक्ष राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षातील पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला घेरण्याचे निश्चीत केले आहे. त्यासाठी नुकताच त्यांनी पालिकेवर भाजप चले जाव असा हजारोंचा मोर्चा काढला. तर, याच मुद्यावरून कामठे यांनीही घरचा आहेर भाजपला दिलेला आहे. भ्र्ष्टाचाराची काही प्रकरणे त्यांनी पुराव्यासहित लावून धरली. सभागृहात त्याविरुद्ध आवाज उठवला. त्यातील एकात नुकताच पोलिसांनी फसवणूक व बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भाजप व त्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कामठेंचा खुबीने वापर राष्ट्रवादीला आगामी पालिका निवडणूक प्रचारात करून घेता येणार आहे. हाच मुद्दा लावून धरीत भाजपने गेली १५ वर्षे पिंपरी पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला २०१७ ला पायउतार होण्यास भाग पाडले होते.

Tushar Kamthe & pcmc Commissioner Rajesh Patil
Krishna Prakash यांनी विधवेकडून लाच घेणाऱ्या पोलिसाला केले निलंबित...

रस्ते व गटार सफाईच्या पालिकेच्या कामातील ५५ कोटींचा घोटाळा कामठेंनी समोर आणला. त्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. तर, स्मार्ट सिटीतील अनियमितता व गैरकारभाराविरोधातही त्यांनी आवाज उठविलेला आहे. स्मार्ट सिटीचे बहूतांश कामे ही आमदार जगताप यांच्या मतदारसंघातच सुरु आहे. त्याचे ठेके हे त्यांच्या पाहुण्यांनाच देण्यात आल्याचा कामठे यांचा दावा आहे. त्याविरोधात आवाज उठवला म्हणून गेल्या पाच वर्षात अघोषित बहिष्कार टाकून कुठलेच पद देण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा पिंपळे निलखचा प्रभाग (क्र.२६ ब ) जगतापांच्या चिंचवड मतदारसंघात येतो. त्यांच्यावरच टीका करीत आणि भाजपच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढीत कामठेंनी राजीनामा दिल्याने तो जगतापच नाही, तर भाजपलाही खूप झोंबणार आहे.

Tushar Kamthe & pcmc Commissioner Rajesh Patil
भाजपच्या बालेकिल्ल्यातच ठाकरेंचे मोदींवर टीकास्त्र ; परिवर्तन होणार, सरकार जाणार!

गेल्या चार दिवसांत चिंचवडमधील भाजप नगरसेवकाचा हा दुसरा राजीनामा आहे. पक्ष नेतृत्वाला म्हणजे जगतापांनाच कंटाळून नूकताच (ता.२१) चंदा लोखंडे यांनीही राजीनामा दिलेला आहे. त्या अजित पवारांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (ता.२६ फेब्रुवारी) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तर, शहराचे दुसरे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातून १६ तारखेला पहिला राजीनामा दिलेले भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. तर, आज राजीनामा दिलेले कामठे हे सुद्धा हाच मार्ग चोखाळणार हे स्पष्ट झाले आहे. कारण आज राजीनामा देतेवेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर होते. राजीनामा दिलेल्या तिन्ही नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वावर टीका करीत तो दिला आहे, हे विशेष.

Tushar Kamthe & pcmc Commissioner Rajesh Patil
मोदीजींनी सांगितलं तर पुतीन नक्की ऐकतील! युक्रेनची थेट मध्यस्थीसाठी गळ

कामठे हे पिंपळे निलखमधून २०१७ ला पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यांचे व आमदार जगतापच नाही, तर पालिकेतील सत्ताधारी भाजप यांचे गेल्या काही दिवसांपासून विळ्याभोपळ्याचे नाते तयार झाले होते. कारण त्यांनी थेट सभागृहातच भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला होता. त्याची दखल न घेतल्याने त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यानंतर ५५ कोटी रुपयांच्या गटार व रस्ते सफाईच्या बोगस टेंडरप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारे आहे. अशी आणखी काही पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यांसह बाहेर काढणार असल्याचे कामठे यांनी आज सांगितले. त्यामुळे हा भाजपाला धोक्याचा इशारा, तर राष्ट्रवादीच्या दृष्टीने दिलाशाची बाब ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com