Mahesh Landge News : भाजपचे आमदार लांडगेंची पुणे महापालिकेला ४८ तासांची मुदत... दिला 'हा' इशारा

BJP News : प्रशासनाने गुळमुळीत भूमिका घेऊन कारवाई न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
Mahesh Landge News
Mahesh Landge NewsSarkarnama

Pune News : पुणे शहराचे नाव ज्यावरून पडले त्या पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या जागेवरील बेकायदा मशीद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर आज (ता.४) तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ''आम्ही अयोध्येतील बाबरी मशीद पाडू शकतो, तर पुण्येश्वरला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी तिथे उभारलेली अनधिकृत मशीद पाडूच शकतो, असा इशारा पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी दिला.

पुण्येश्वर मंदिराजवळील अनधिकृत मशीदीचे बांधकाम ४८ तासांत हटवा... अन्यथा, आम्ही ती हटवू, असा इशारा लांडगेंनी पुणे महापालिकेला यावेळी दिला. न्यायालयाने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. तरीही प्रशासनाने गुळमुळीत भूमिका घेऊन कारवाई न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

Mahesh Landge News
BJP Political News : पंकजा मुंडे यांच्या शिव `शक्ती` कडे भाजपची पाठ..

पुणे शहराचा इतिहास कायम ठेवण्यासाठी हा लढा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे आदी यावेळी उपस्थित होते.

Mahesh Landge News
Beed News : बीडच्या भुमिपुत्राकडूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर ; जरांगे यांच्यामुळे अंतरवालीची देशात ओळख

कोण आला रे कोण आला…

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांची खडाजंगी झाली होती. त्यामुळे आजच्या आंदोलनात त्यांनी भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी ''कोण आला रे कोण आला… अबू आझमीचा बाप आला…'' अशी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्याच्या कोंढवा, हडपसर भागात, जर काही लोक घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील. तर आम्ही सुद्धा घरात घुसून मारल्याशिवाय गप्प बसणार नाही… असा इशाराही लांडगेंनी यावेळी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com