Mahavikas Aghadi NCP News : जागावाटप झालेले नसताना 'मविआ'तील राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडसाठी मुलाखती घेतल्याने चर्चांना उधाण!

Sharad Pawar NCP and PImpari-Chinchwad - पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदारसंघातून नऊ, तर मावळात एक अशा चार जागांसाठी दहा जणांनी मुलाखत दिली.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा आघाडीत अद्याप पूर्ण सुटलेला नाही. तरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखती पुण्यात घेतल्या. मात्र आता जागा पक्षाला सुटणार की नाही, हे निश्चित झाले नसतानाही त्या झाल्याने ही मुलाखत दिलेले काहीसे चिंतेतच आहेत, तर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंगबरोबर इच्छूकांचाही मोठा ओढा वाढलेला आहे. या मुलाखतीतून ते दिसले. मात्र, काही जागा मित्रपक्ष ठाकरे शिवसेनेला जाण्याची शक्यता असूनही त्या ठिकाणच्या मुलाखती झाल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली. शरद पवार(Sharad Pawar), सुप्रिया सुळे, रोहित पवार, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, जिल्हा महिलाध्यक्षा भारती शेवाळे आदींनी या मुलाखती घेतल्या. मुलाखत अशी नाही, तर इच्छा प्रदर्शित केली, तयारी सांगितली असे ती मुलाखत दिलेल्या एका इच्छूकाने सरकारनामाला सांगितले.

NCP Sharad Pawar
Dilip Mohite-Patil : २०१४ नंतर मोहिते विरोधकांची पुन्हा एकजूट दिसणार? ; निकालाचे संकेत उद्याच मिळणार!

पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad)मधील तीन मतदारसंघातून नऊ, तर मावळात एक अशा चार जागांसाठी दहाजणांनी मुलाखत दिली. त्यात सर्वाधिक सहा पिंपरी राखीव मतदारसंघातील आहेत.तेथे गेल्यावेळी तिकीट जाहीर होऊन शेवटच्या क्षणी तिकीट कापले गेलेल्या सुलक्षणा शिलवंत-धर या माजी नगरसेविकेसह शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे आदींनी ही मुलाखत दिली.तर,विधानसभा लढण्यासाठी घरवापसी केलेले अजित गव्हाणे आणि आणखी एकाने भोसरीसाठी मुलाखत दिली. चिंचवडमधून शहराध्यक्ष तुषार कामठे यांचीच ती झाली. मावळमधून तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ यांनी ती दिली.

पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही आमदार महायुतीचे (दोन भाजप आणि एक राष्ट्रवादी) असून त्यांचे जागावाटप झाल्यात जमा आहे. एवढेच नाही,तर तेथील उमेदवार सुद्धा जवळपास ठरले आहेत. मात्र, आघाडीत कोणी कोणती जागा लढवायची हेच ठरलेले नाही. उमेदवार, तर त्यानंतरच निश्चित होणार आहेत. शहरातील दोन जागा लढवून एक शिवसेनेला(Shivsena) राष्ट्रवादी सोडेल,असा अंदाज आहे.

पण, कोणत्या लढणार व कोणती सोडणार हाच त्यांच्यापुढे मोठा पेच आहे. कारण पिंपरी वगळता इतर दोन्ही ठिकाणी त्यांचे आमदारच आतापर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे पिंपरी ते सोडतील, असे वाटत नाही.

NCP Sharad Pawar
NCP Politics : बालेकिल्ल्यातच अजितदादांना धक्का? शरद पवारांची भेट घेतलेल्या माजी आमदारानं दौऱ्याकडे फिरवली पाठ

तर, भोसरी व चिंचवडमध्ये आतापर्यंत त्यांना यश मिळालेले नसल्याने त्या दोन्ही लढवायच्या का? हा ही त्यांच्यापुढे पेच आहे. त्यात २०१९ ला एकसंध असलेला पक्ष आता दुभंगला आहे. अशाप्रकारे कुठल्या जागा लढणार वा त्या मिळतील हे निश्चित झालेले नसताना त्यांनी मुलाखती घेतल्या. त्यामुळे त्याची चर्चा झाली दरम्यान, प्रचाराला वेळ खूप कमी मिळणार असल्याने शरद पवारांनी उमेदवारीचा कानोसा आताच जाणून घेतल्याचे समजले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com