Pune Lok Sabha Bypoll Election: पुणे लोकसभेची पोटनिवडणुक होणार का ?; कायदा काय सांगतो ?

Pune Lok sabha bypoll Election : निवडणूक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागते.
funeral procession of Girish Bapat
funeral procession of Girish BapatSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok sabha bypoll Election News update : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांचे काल (बुधवारी) निधन झाले. त्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते का याबाबत कायदा काय सांगतो, हे जाणून घेऊया.

गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता, त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. पण पक्षातील अन्य नावांचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यात माजी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहळ, आमदार माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत आहेत.

funeral procession of Girish Bapat
Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

बापटांचे सुपुत्र गौरव बापट हे राजकारणात सक्रीय नाहीत, तर स्नूषा स्वरदा या मुळच्या सांगलीच्या असून त्या माजी नगरसेविका आहेत, पण पुण्याच्या राजकारण त्या नवख्या आहेत. त्यामुळे बापटांच्या कुटुंबाऐवजी अन्य दुसऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यात लोकसभेची पोटनिवडणुक होईल का, यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी 151 A लोकप्रतिनिधी कायद्याचा आधार घेत याबाबत भाष्य केलं आहे. "पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते," असे बापट म्हणाले.

funeral procession of Girish Bapat
BJP Leaders' Sad Demise : भाजपवर आघात ; तीन महिन्यात 'ताई', दोन 'भाऊ' गमावले..

उल्हास बापट म्हणतात..

१९५१ सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक २०२४ मे-एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणुक घ्यावी लागेल आणि ही निवडणूक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागते.

कुणाला उमेदवारी देणार ?

नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी डावलून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. हा निर्णय भाजपच्या अंगलट आल्याचे बोलले जाते. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपने घेतलेला निर्णयाची पुनरावृत्ती पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत टाळण्यासाठी भाजपची रणनीती काय असणार, हे येत्या काही दिवसातच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com