Pune News : पुण्यात कोणत्या ठेकेदारासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांचा आटापिटा

सर्वसामान्य पुणेकरांच्या कररुपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रकार सुरू आहे.’
PMC News
PMC NewsSarkarnama

PMC News : पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत ठराविक ठेकेदारांसाठी भाजपाचे आजी-माजी नगरसेवक व आमदार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने (NCP) करण्यात येत आहे. ठराविक ठेकेदाराला समोर ठेऊन कामाची निविदा तयार करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत असून याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आले.

पुणे शहरातील विविघ भागातील रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार,माजी आमदार, माजी पक्षनेते व काही पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात येत आहे.

PMC News
Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांना तात्काळ रखडलेली कर्जमाफी द्या

या संदर्भात सरकारनामाशी बोतलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘ या विरोधात सर्व माध्यांमध्ये आवाज उठवूनदेखील राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर टेंडरराज पुन्हा सुरू झाले आहे. यात सर्वसामान्य पुणेकरांच्या कररुपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रकार सुरू आहे.’’

या निविदेतील अटी-शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा काढावी व संबंधित अधिका-यांची चौकशी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष जगताप यांनी केली आहे. या मागणीकरिता आंदोलन करून महाापलिका आयुक्त विक्रमकुमार यांना आज दिवेदन देण्यात आले आहे. आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा जगताप यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com