Pune News : पुणे शहरात अनेक विचारवंत होऊन गेले. लोकशाही टिकवण्यासाठी काही विचारवंत कार्यक्रम घेत आहेत. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले. लोकशाहीच्या विरोधात आंदोलन करणे हे अपेक्षित होते. देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही आवडत नाही. जिथं तिथे भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. यावेळी पत्रकार निखिल वागळे यांनी आमच्याही कार्यक्रमाला विरोध केलेला आहे. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी मुभा असावी. पत्रकार आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्याला विरोध करायचा, हे योग्य नाही, असे ते म्हणाले.
सध्या अजित पवार गटासमोर दुसरा पर्याय नाही. त्यांना भाजपची स्क्रिप्ट वाचावी लागत आहे. भाजप जे सांगेल ते त्यांना करावा लागत असल्याने कदाचित त्यांना या ठिकाणी यावे लागले आहे. कशाच्या विरोधात आपण आंदोलन करतोय हे सुद्धा त्यांना माहिती नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली आहे.
लोकशाही टिकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी ही मदत केली पाहिजे. काही दिवसांपूर्वी गुंडांचा परेड काढली. मात्र, त्या दुसऱ्याच दिवशी त्या गुंडानी रिल्स सुद्धा टाकल्या. लोकांच सरकार आहे की गुंडांचा सरकार आहे. हे कुठेतरी सांगावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पार्थ पवार यांनी गजानन मारणे यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता रोहित पवार म्हणाले, कोण कोणाला कसं भेटतं हे बघितल्यावर सामान्य लोकांचे काम होत नाही हे दिसते. काम गुंडागर्दी करणाऱ्यांचं होते. इलेक्शन जवळ येईल. तसं या गुंडांना सांगण्यात येईल. जे लोक भाजपचा विरोध करतायेत त्यांचा आवाज दाबा. येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला अशा अनेक गुंडांना बाहेर काढले जाईल. लोकशाही दाबण्यासाठी भाजप (Bjp) त्यांचा वापर करेल. मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जाऊन गुंड भेटतात. रीलस टाकतात. शेतकऱ्यांना दालनात प्रवेश दिला जात नाही. पण गुंडांना दालनात जाऊन फोटो काढता येतो. यावरून हे सरकार गुंडांच आहे, असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुटुंब आणि पक्ष फोडण्यात इतके व्यस्त आहेत की गुंडांवर त्यांच नियंत्रण नाही. आता त्यांना जी कारवाई करायची ते करू द्यात. विधानसभेत आणि लोकसभेत महाविकास आघाडीचेच सरकार घेणार आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार महाविकास आघाडीचेच निवडून येणार असल्याचा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.
(Edited by - Sachin Waghmare)