Abhishek Ghosalkar : तब्बल २० तास तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, हुंदक्यावर हुंदके अन् डबडबलेले डोळे !

Mumbai News : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर गेल्याची बातमी दहिसर परिसरात वाऱ्यासारखी पसरली, अन् त्यानंतर सर्वत्र काही वेळातच सन्नाटा पसरला.
Ghosalkar Family
Ghosalkar FamilySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दहिसरमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री हत्या झाली. फेसबुक लाइव्ह करणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेने संपूर्ण दहिसर परिसर हादरला. अभिषेकच्या आईचा तब्बल २० तास तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, हुंद्क्यावर हुंदके अन् डबडबलेले डोळे पाहून प्रत्येक जण गहिवरून गेला होता.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. अभिषेकच्या अचानक जाण्याने घोसाळकर यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ऐन तारुण्यात मुलाच्या झालेल्या मृत्यूचे दुःख त्यांना सहन झाले नाही. अभिषेकच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूच्या धारा २० तासांपासून थांबल्या नाहीत. त्यांचा आक्रोश अगदी सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून आपसूकच पाणी वाहत होते.

Ghosalkar Family
Abhishek Ghosalakar: अभिषेक घोसाळकरांचे प्लॅनिंग ठरलं होतं, पत्नी मुलांसह जाणार होते; पण...

गुरुवारी सायंकाळी अभिषेकवर गोळीबार झाल्याचे समजताच त्याच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर उपचार होतील व त्यातून बरा होऊन अभिषेक घरी परतेल ही भाबडी आशा त्यांना होती. मात्र, उपचार सुरू असलेल्या अभिषेकच्या घाव वर्मी लागली असल्याने रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली.

या वेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या (Shivsena) संयमाचा बांधही या घटनेमुळे फुटला. अभिषेक गेल्याची बातमी दहिसर परिसरात वाऱ्यासारखी पसरली, अन् त्यानंतर सर्वत्र काही वेळातच सन्नाटा पसरला. संपूर्ण दहिसर परिसरावर शोककळा पसरली होती.

अभिषेकच्या आईच्या दुःखाला तर पाराच उरलेला नव्हता. अश्रूच्या न थांबणाऱ्या धारा व त्यांचा मन हेलावून टाकणारा आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकत होता. त्यांच्या डोळ्यांतील अश्रूच्या धारा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. आक्रोश, हुंद्क्यावर हुंदके अन डबडबले डोळे पाहून प्रत्येक जण गहिवरून गेला होता.

शुक्रवारी सकाळी दहिसर परिसरातील निवासस्थानी अभिषेक यांचा पार्थिव आणण्यात आल्यानंतर वातावरण अगदी शोकसागरात बुडाले होते. या वेळी अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर (vinod Ghosalakar) यांनासुद्धा अश्रू अनावर झाले होते. अभिषेकच्या पत्नी तेजस्विनी व लहान मुलांच्या डोळ्यातील अश्रूचा बांध काही केल्या थांबत नव्हता. या वेळी त्यांच्या कुटुंबाचा हा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. घोसाळकर यांच्या निवासस्थानी शिवसैनिक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

R

Ghosalkar Family
Abhishek Ghosalkar Case : घोसाळकरांचं प्लॅनिंग मॉरिसला माहिती होतं! गोळ्या झाडून तो ओरडतच बाहेर आला...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com