Ravindra Chavan News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामाना होत आहे. अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत थेट भाजपवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. महापालिका लुटून खाल्ली, या लुटारुंना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपने देखील पलटवरा केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलतायेत. आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे.
अजित पवार गिरेबाँन मे झाँक के देखीये, असा टोला देखील चव्हाण यांनी लगावला. ते म्हणाले, पुण्याची निवडणूक ही पुणेकरांच्या नागरी समस्या सोडण्यासाठी, चांगल्या सुविधा कोण देऊ शकतं यावर ही निवडणूक आहे. आणि या सुविधा भाजप देऊ शकेल.
अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, भाजप हा लुटारुंची टोळी झाला आहे. आमच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. मात्र, मोदी लाटेत अनेक सहकारी भाजपमध्ये जाऊन बसले. अर्ज भरलेल्या उमेदवारांचा पाठलाग केला गेला. काहींना गाडीत बसून धमकावले, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.