Kasba By Election : भाजपाकडून कसब्यासाठी पाच जणांची शिफारस; कुणाल टिळकांचांही समावेश

Kasba By Election : दिल्लीतून नेमकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
Kasba By Election
Kasba By Election Sarkarnama

Kasba By Election : भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर आता कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

काँग्रेस (Congress) पक्षानेही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. तसेच भाजप-काँग्रेस अॅक्शन मोडवर आली असून बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय निवड समितीला या पोटनिवडणुकीसाठी पाच नावांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळत आहे.

Kasba By Election
Daund News : दौंड पुन्हा हादरले; भीमानदी पात्रात आज पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळला

कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात पाच नावे चर्चेत असून त्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील दोन नावं या यादीत असल्याते सांगण्यात येत आहे. त्यामध्ये शैलैश टिळक, कुणाल टिळक यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे या नावांचा देखील प्रस्ताव केंद्रीय निवड समितीला भाजपने दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, येत्या तीन दिवसांत केंद्रीय निवड समितीकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता दिल्लीतून नेमकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

तसेच कसबा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बोलताना सांगितलं होतं की,''कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत भाजप तयारी करत आहे. आमच्या कार्यपद्धती प्रमाणे संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार झाली आहे.

ती आम्ही केंद्राकडे पाठवू, तसेच ३१ किंवा १ तारखेपर्यंत या यादीवर चर्चा होईल आणि दिल्लीतून नावे घोषीत होतील'', असं माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते. त्यामुळे आता कुणाचं नाव दिल्लीतून जाहीर होतं? हे येणाऱ्या दोन- तीन दिवसांत समोर येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com