Pune News : ...पण शेवटी विजय हा पांडवांचाच झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

Chandrashekhar Bawankule :''...तरीही उद्धव ठाकरेंनी कपट कारस्थान केले''
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

प्राची कुलकर्णी :

Chinchwad and Kasba By-Election : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. सर्वांनीच आपली सगळी ताकद पणाला लावलीय.

या पार्श्वभूमीवरच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवसभर कसबा मतदारसंघात आहेत. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहीनीशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या विधानावर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरेंवरही टीका करत विजय हा पांडवांचाच झाला, असं म्हणत ठाकरेंना टोला लगावला.

Chandrashekhar Bawankule
Sandipan Bhumre News : विरोधक तुटून पडल्यामुळे भुमरेंकडून बोरनारेंना मदतीचा हात..

कसबा आणि चिंचवडसाठी भाजपवर येवढी ताकद लावण्याची वेळ का आली? या प्रश्नाचे उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ''कुठल्याही निवडणुकीचा आम्ही प्रचार-प्रसार हा तेवढाच करत असतो. त्यामुळे आम्ही येथेही काही वेगळं करत नाहीत. आमचे सर्व नेते हे प्रत्येत निवडणुकीला असतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटण्यात काम आम्ही करतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोंधळ केला आहे. त्यामुळे आम्ही मतदारांना विनंती करून आम्ही मतदान मागतो. त्यामुळे सर्वांना भेटण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो'', असं ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Kasba By-Election : कसबा-चिंचवडमध्ये तुम लढो, हम 'मनसे' कपडे संभालते है !

''देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे येथे येत आहेत. मात्र, अमित शाह पुण्यात येणार असले तरी त्यांचा आणि या निवडणुकीचा काही संबंध नाही. त्यांचा दौरा नियोजित आहे. ते पुणे, नागपूर, कोल्हापूरलाही जाणार आहेत'', असंही ते यावेळी म्हणाले.

या पोटनिवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून ब्राम्हण समाजाला डावलल्याची चर्चा आहे याचा फटका बसेल असं वाटतं का? यावर ते म्हणाले, ''मी जेव्हा जेव्हा पुण्याला येतो. तेव्हा विचार परिवाराला भेटत असतो. प्रश्न राहिला तो समाजाचा. मला वाटतं ही काय सामाजिक निवडणूक नाही. देशाचे आणि राज्याचे हित ज्यामध्ये आहे ते आपण पाहिलं पाहिजे. मुक्ताताई होत्या तेव्हा त्यांनी चांगल काम केलं. त्यामुळे आता कोणीही नाराज नाही'', असं त्यांनी स्पष्ट केलं.

या निवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा हे पुढील राजकारणाची नांदी आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, ''मनसेलाच नाही तर आम्ही महाविकास आघाडीलाहा आवाहन केले होते. फार कमी काळासाठी या निवडणुका आहेत. मात्र, तसं काही झालं नाही. या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वच पक्षांना विनंती केली. ती काहींनी ऐकली काहींनी ऐकली नाही'', असं त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Devendra Fadanvis : आमच्या विजयात फडणविसांचा सिंहाचा वाटा; कसा, ते चव्हाणांनी सांगितले !

''देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून विधान केले होते. त्यावर बावनकुळे म्हणाले, मोदींच्या आणि फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. त्यावेळी ते नेहमी सांगत होते की फडणवीसच मुख्यमंत्री होणार.

मात्र, तरीही उद्धव ठाकरेंनी कपट कारस्थान केले. त्यांनी षडयंत्र करत राजकारण केले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी दरवाजे बंद केले. पण काही झालं असलं तरी या सगळ्यामध्ये विजय हा पांडवांचाच झाला'', असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com