Suhas Kande News: ''...म्हणून ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला! शिंदे गटाच्या सुहास कांदेंचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : ''...तर मग उध्दव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा.''
Suhas Kande News, Uddhav Thackeray
Suhas Kande News, Uddhav Thackeray Sarkarnama

Nashik News : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत शिंदे गटाचे नेते व आमदार सुहास कांदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला नाही, पण मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला असं उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आमदार सुहास कांदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.

उध्दव ठाकरेंच्या टीकेनंतर आमदार सुहास कांदे(Suhas Kande) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांदे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पाटणकरांची चौकशी करण्याची मागणी करा. किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे.

Suhas Kande News, Uddhav Thackeray
BJP News : माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत नेत्याच्या मुलीवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. पण मी ज्या कॉन्ट्रॅक्टरची नाव सांगतो, त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा.या कॉन्ट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा असा खळबळजनक दावाही आमदार कांदे यांनी केला आहे.

...ही फक्त टोमणे सभा!

सुहास कांदे यांनी मालेगाव येथील सभेवरुनही उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. कांदे म्हणाले, उद्धव ठाकरेंची मालेगाव येथील सभा बघून दया आली. तिकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन करायचे, इकडे त्यांचा विरोध करायचा. राहुल गांधींबद्दल दुटप्पी भूमिका घेऊ नका. मुंबईत बाजू वेगळी घ्यायची, मालेगावमध्ये वेगळी भूमिका घ्यायची. पण ही फक्त टोमणे सभा झाली. उद्धव साहेब हिंदुत्व विसरून गेले आहेत अशी टीकाही कांदे यांनी केली आहे.

Suhas Kande News, Uddhav Thackeray
Sambhaji Raje News : संभाजीराजेंची मोठी घोषणा; स्वराज्य संघटना 2024 ची लोकसभा, विधानसभा लढणार

उध्दव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ?

उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत भाजपवर सडकून टीका केली. तसेच विरोधी पक्षाचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. याचवेळी त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवरही जोरदार प्रहार केला होता. त्यात आमदार सुहास कांदे यांचाही समावेश आहे. कांदे यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, कांद्याला भाव मिळाला नाही असे तुम्ही म्हणता. मी म्हणतो कांदा खरेदी झाली. मागील वर्षी एक कांदा 50 खोक्याला विकला गेला अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केला होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com