Congress Agitation against BJP : पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे ; कॉंग्रेसचे भाजपविरुद्ध आंदोलन

Pimpri Chinchwad Agitation against BJP : भाजपने शहरात "आम्ही सारे सावरकर" चे फलक लावले.
Congress Agitation against BJP
Congress Agitation against BJP Sarkarnama

Pimpri Chinchwad Agitation against BJP : राहूल गांधीची खासदारकी रद्द करण्याविरोधात पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसने जनआंदोलन छेडले आहे. त्यात "पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे" ही घोषणा लक्षवेधी ठरली.

राहूल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याविरोधात पिंपरी-चिंचवड भाजपने शहरात "आम्ही सारे सावरकर" चे फलक लावले. आता ते सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत. तर, गांधीची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसनेही कालपासून भाजपविरुद्ध जनआंदोलन सुरु केले आहे.

Congress Agitation against BJP
Karnataka Viral Video : PM मोदींच्या फोटोचे शेतकऱ्याने घेतले चुंबन ; Video व्हायरल..

त्याच्या पहिल्या टप्यात कालपासून स्वाक्षरी मोहीम सप्ताह सुरु करण्यात आला.तर, काल (गुरुवारी) संकल्प सत्याग्रह केला गेला. दोन तारखेला ते "जेल भरो आंदोलन" करणार आहेत.

राहुल गांधी यांनी संसदेमध्ये केंद्र सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भांडवलदार गौतम अदानी यांचे संबंध काय आहेत,अदानी यांच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोठून आली, असे प्रश्न विचारले होते.

Congress Agitation against BJP
BV Srinivas Defamation Notice: स्मृती ईराणींना 'डार्लिंग' म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या अंगलट; Video पाहा; डार्लिंग बना कर…

त्याचे उत्तर देण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने गांधींची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने केला. संसदेत खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार का करत आहे, याचा जाब विचारण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केल्याचे पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आज सत्याग्रह आंदोलनप्रसंगी सांगितले.

त्यात माजी महापौर कविचंद भाट, महिला शहराध्यक्ष सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले तसेच लक्ष्मण रुपनर, हिरा जाधवआदींनी भाग घेतला.यावेळी त्यांनी "पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे" अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com