Pimpri-Chinchwad: नव्या राजकीय भूकंपामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप 'अब की बार सौ पार' अवघड

Pune News: पिंपरी-चिंचवडचा विचार केला, तर भाजपची 'अब की बार, सौ पार' ही घोषणा प्रत्यक्षात येणे यामुळे अवघड झाले
BJP News
BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राज्यातील ताज्या राजकीय बंड तथा भूकंपाचा पहिला परिणाम हा दिवाळीत अपेक्षित महापालिका निवडणुकीत दिसणार आहे. पिंपरी-चिंचवडचा विचार केला, तर भाजपची 'अब की बार, सौ पार' ही घोषणा प्रत्यक्षात येणे यामुळे अवघड झाले आहे. मात्र, नवा भिडू राष्ट्रवादी काँग्रेस आणि ते मिळून शंभरीपार करून सत्ता निर्विवादपणे राखू शकतात.

पुढील वर्षी मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे गणित ताज्या बंडामागे आहे. मात्र, त्यापूर्वीच महापालिका निवडणूक दिवाळीत होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गतवेळी २०१७ ला १५ वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता दूर करून भाजप प्रथमच सत्तेत आली. १२८ पैकी ७७ त्यांचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुढील निवडणुकीत त्यांनी 'अब की बार, सौ पार'ची घोषणा दिली होती.

BJP News
Bacchu Kadu News : बच्चू कडूंना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन शांत करण्याचा प्रयत्न, पण...

परंतू, आता नवा भिडू राष्ट्रवादी मिळाल्याने त्यांच्याशी युती नाही झाली, तरी त्यांच्यासाठी निम्या जागा, तरी त्यांना सोडाव्या लागतील. त्यातून शंभरावर नगरसेवक निवडून आणणे भाजपला शक्य होणार नाही. पण, सत्तेत राहण्याची खात्री निर्माण झाली आहे. महापालिकेनंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मोठा फायदा होणार असल्याने त्यांच्याशी भाजपला पालिका निवडणुकीत तडजोड ही करावीच लागणार आहे.

महापालिका निवडणुकीत आता भाजपला जसे 'अब की बार, सौ पार' करता येणार नाही. तसेच विधानसभेला शहरात त्यांना शत प्रतिशत भाजप करण्यात अडथळा येणार आहे. शहरात तिन्ही आमदार भाजपचे होणे आता अवघड झाले आहे. भोसरी व चिंचवडला त्यांचे अनुक्रमे महेश लांडगे आणि अश्विनी जगताप आमदार आहेत. तर, पिंपरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) अण्णा बनसोडे आमदार आहेत.

BJP News
Sanjay Shirsat News : मी शपथेवर सांगतो, वर्षावर झालेल्या बैठकीत तसे काही घडलेच नाही...

पिंपरीची जागा भाजपला आता सोडावी लागणार आहे. मात्र, लोकसभेला राष्ट्रवादीच्या (शरद पवार) ताब्यात असलेल्या शिरूरमध्ये कमळ फुलविण्याची आयती संधी त्यांना आता चालून आली आहे. तसेच मावळमध्ये त्यांचा मित्र शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे यांचा २०२४ चा मार्गही आता आणखी सुकर झाला आहे.

त्यांना खासदारकीची हॅटट्रिकची संधी तेथे चालून आली आहे. त्यातून केंद्रात पुन्हा सत्तेची आणि नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानकीची हॅटट्रिक साधण्यात उद्योगनगरी म्हणजे तेथील भाजपला आपला खारीचा वाटा उचलणे आता शक्य होणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com