Baramati News : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्यांची मांदियाळी; प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम

भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्याचे या पूर्वीच जाहीर करुन त्याष्टीने व्यूहरचनाही सुरु केली आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

BJP's AhilyaDevi Holkar Jayanti program : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजप शक्तीप्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, राम शिंदे, राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता. २४ जून) बारामतीत हजेरी लावणार आहेत. (BJP's Ahilya Devi Holkar Jayanti program at Baramati on Saturday)

बारामतीच्या (Baramati) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण राज्य सरकारने केले आहे. त्यानंतर गिरीश महाजन प्रथमच बारामतीत येत असल्याने त्यांचा सत्कार करण्याचे भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.

BJP
Opposition Unity Meeting : केजरीवाल-अब्दुला आमने सामने; 'आप'ने अध्यादेशाचा विषय काढताच, अब्दुलांनी काढले ३७० कलम

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना रविवारी (ता. २५ जून) पाचारण केले जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम जगताप, रवींद्र धंगेकर आदी उपस्थित राहणार आहेत. विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनही सिध्दरामय्या यांच्या बारामती भेटीकडे पाहिले जात आहे.

BJP
Solapur Politic's : सोलापुरातील भाजप नेत्याच्या मुलीला BRS कडून लोकसभा उमेदवारीची ऑफर?

या निमित्ताने भाजप व राष्ट्रवादी परस्परांवर काय टीकास्त्र सोडणार, या बाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्याचे या पूर्वीच जाहीर करुन त्याष्टीने व्यूहरचनाही सुरु केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या वतीनेही भाजपवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. बारामतीत भाजप ताकद लावणार हा संदेश या निमित्ताने देण्याचाही एक प्रयत्न असेल.

BJP
KCR In Solapur : केसीआर यांचे सोलापुरात स्वागत; पण असे पक्ष देशावर राज्य करू शकत नाहीत, सुशीलकुमार शिंदेंची गुगली

आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीसह पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ताकद लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अजित पवार यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी सर्वच निवडणुकांत विकास हाच मुद्दा प्रमुख असेल, हे या पूर्वीच जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत ताकद लावण्याच्या दृष्टीने बारामतीसह, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या सर्वच विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com