Solapur Politic's : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे सोलापुरात स्वागत आहे. त्यांना सोलापूरची शिक कढई फार आवडेल, असे विधान काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी करत ‘असे पक्ष देशावर राज्य करू शकत नाहीत,’ असा चिमटाही त्यांनी काढला. (Welcome to KCR in Solapur; Sushil Kumar Shinde)
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी शुक्रवारी (ता. २३ जून) सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात (Pandharpur) येणार आहेत. त्याबाबतच्या प्रश्नावर शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले की, मी देशाचा गृहमंत्री असतानाच आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य माझ्या सहीने निर्माण झाले आहे. त्यांची काय स्थिती होती, हेसुद्धा मला माहित आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांची काही ताकद नाही, असे लोक सुध्दा येतात. पण, ते देशावर कधीच राज्य करू शकत नाहीत. चंद्रशेखर राव यांना सोलापुरात येऊ द्या; आपण त्यांचे स्वागत करू, त्यांना सोलापूरची प्रसिद्ध शीक कढई फार आवडेल, अशा शब्दात शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
चिमणी पाडायची गरज नव्हती : सुशीलकुमार शिंदे
चिमणी पाडण्याची गरज नव्हती. एका बाजूने विमान उतरतात. पायलटला सूचना केल्यानंतर ते त्या पद्धतीने विमाने उतरविणे आणि टेक ऑफ या गोष्टी करतात. पण वाटोळंच करायचं म्हटल्याने त्यांनी ते केले आहे. चिमणी नियमित करण्याचा काडादींचा प्रयत्न होता. मात्र, मी सत्तेमध्ये असताना ते लक्षात आलं असतं तर मी ते नियमित केलं असतं, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.