Shivsena Politics: शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर; थेट जिल्हा प्रमुखांनाच पदावरून हटवण्याची मागणी

Solapur : सोलापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांना पदावरून हटवण्याची मागणी सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष नागेश वनकळसे यांनी केली.
Shivsena
ShivsenaSarkarnama

Mohol News: सोलापूर जिल्हा ग्रामीणचे शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांना पदावरून हटवण्याची मागणी शिवसेनेच्या सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष नागेश वनकळसे यांनी पक्षातील वरिष्ठांकडे केल्यामुळे सोलापूर जिल्हा शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसह अन्य निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

मोहोळमध्ये सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष नागेश वनकळसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि शिवसेना याबाबत मतदारांतून अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, याचा राजकीय लाभ घेण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघात ग्रामीणचे निष्क्रीय जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्यामुळे विपरीत परिस्थिती उद्भवली आहे", असा आरोप त्यांनी केला.

Shivsena
Marathwada Political News : चंद्रकांत खैरे चारदा खासदार झाले ; पण कुटुंबीय आजही विकतात अंत्यसंस्काराचे साहित्य..

जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या पदाची मुदत संपली आहे, त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे केली असल्याची माहिती वनकळसे यांनी दिली.

ते म्हणाले, "विद्यमान जिल्हाप्रमुखांनी मतदारसंघात एकही शाखा उघडली नाही. अथवा समाज विकासाचे कोणतेही ठळक काम केले नाही. आगामी काळात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्वच निवडणुका जर विजयाच्या दृष्टीने लढवायच्या असतील, तर पदासह वैयक्तिक प्रतिष्ठा जपणाऱ्या ग्रामीण जिल्हा प्रमुखाला पहिल्यांदा पदमुक्त केले पाहिजे," असे ते म्हणाले.

दरम्यान, अनेक वर्षांपासून ज्यांनी शिवसेनेशी वैचारिक बांधिलकी जपली, अशा क्रियाशील कोणत्याही कार्यकर्त्याला पदावर काम करण्यासाठी संधी मिळावी, अशी आग्रही मागणी आपण एका शिष्टमंडळाला सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, आमदार भरत गोगावले, सचिव संजय मोरे यांना करणार असल्याचे शेवटी वनकळसे यांनी सांगितले.

Edited by Ganesh Thombare

Shivsena
Hasan Mushrif News : मंत्री हसन मुश्रीफांचे 'ते' विधान अन् कोल्हापूरमधील 18 गावं पेटून उठली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com