MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत कमी पडलो; भाजपचे रणनितीकार महाजनांनीच दिली कबुली

Chinchwad By-Election : कसबा आणि चिंचवड निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी फक्त एक जागा भाजपला, एक अपक्ष आणि तीन महाविकास आघाडीला मिळाल्या. या निवडणुकीत कमी पडल्याची कबुली भाजपचे रणनितीकार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच दिली.

विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election) नागपूर या बालेकिल्यातील आणि भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या होमटाऊनमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागलेला आहे. ऐनवेळी उमेदवार दिल्याची चूक भोवली, अशी या अपयशाची कबुली महाजन यांनी यावेळी दिली. मात्र, भविष्यात होऊ घातलेल्या कुठल्याही निवडणुकीत आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

Girish Mahajan
Konkan News : सिंधुदुर्गचा खासदार अन् आमदार महायुतीचाच; आगामी निवडणुकांचे फडणविसांनी ठोकला शड्डू

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निधन झालेले तेथील पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी आज जाहीर झाल्याने त्यांच्या भेटीसाठी आले तेव्हा त्यांनी वरील कबुली दिली. मात्र, विधानपरिषदेच्या या निकालाचा कसलाच परिणाम चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीवरच नाही, तर येणाऱ्या महापालिकांसह इतर सर्वच सार्वत्रिक निवडणुकांवर होणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Girish Mahajan
Chinchwad By-Election : उमेदवार जाहीर केले असले, तरीही बिनविरोधसाठी भाजपचे प्रयत्न सुरुच

विधान परिषद (MLC) निवडणुकीतील अपयशाची कारणमिमांसा करताना या निवडणुकीचे ठोकताळे वेगळे असतात, असे महाजन म्हणाले. मतदार नोंदविलेले असतात, अगोदरच तयारी केलेली असते असे सांगताना विरोधक या बाजूवर भारी पडल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले. विधानपरिषदेच्या या निवडणुकीप्रमाणे पुढील निवडणुकीत कमी पडणार नाही, असे सांगत ते निकालातून दिसूनही येईल, असे ते म्हणाले.

कसबापेठच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या परिवारात उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा चुकीची असल्याचंही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com