Konkan News : सिंधुदुर्गचा खासदार अन् आमदार महायुतीचाच; आगामी निवडणुकांचे फडणविसांनी ठोकला शड्डू

Uddhav Thackray : महाविकास आघाडीने कोकणसाठी काहीही केलं नसल्याचा आरोप
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Konkan BJP News : सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ केला. तसेच बँका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर संस्थात भाजपची ताकद काय आहे, हेही विरोधाकांना दाखवून दिली. आता पुढील वर्षी येथील खासदार आणि आमदारही भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीचाच असणार, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे शड्डू ठोकले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगडेवाडी (Angadewadi) येथील भराडी देवी (Bharadi Devi) यात्रेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अडीच वर्षात कोकणसाठी एकही काम केलं नाही. कोकणात आलेल्या दोन चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचं दीडशे-दोनशे कोटीही दिले नाहीत. कोकणने त्यांना आशिर्वाद दिला, मात्र उतराई होण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी कोकणकडे दुर्लक्ष केलं, असा घणाघात फडणविस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

Devendra Fadnavis
Dnyaneshwar Mhatre : विजयी गुलालात रंगलेल्या चोरट्याचा आमदार म्हात्रेंच्याच खिशावर डल्ला

कोकणवर महाविकास आघाडीचं (MVA) बेगडी प्रेम आहे. त्यांनी कोकणचे जे नुकसान केलंय ते कधीही भरून निघणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "कोकणात येणारा रिफायनरी प्रकल्प ग्रीन होता. मात्र त्यास विरोध करून तो रखडवला, अन्यथा आतापर्यंत तो सुरू झाला असता." असं म्हणत यापुढील काळात तो राज्यात आणूच, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

Devendra Fadnavis
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्वर म्हात्रेंनंतर सत्यजीत तांबेंचेही महत्त्वाचे विधान; म्हणाले...

पुढे ते म्हणाले, "रिफायनरीबाबत त्यांनी खोटा प्रचार केला. ही ग्रीन रिफायनरी होती. ती नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानाची रिफायनरी होती. आजपर्यंतच्या भारतातील सर्वात मोठी तीन लाख कोटींची गुंतवणूक या ठिकाणी होणार होती. तीन सरकारी कंपन्या ती गुंतवणूक करणार होते. त्यामुळे एक लाख रोजगार निर्माण होणार होता. तसेच अप्रत्यक्षरित्याही अनेक लोकांना रोजगार मिळाला असता. मात्र खोटं सागून येथील नागरिकांना प्रथम बहिकवलं. त्यानंतर सांगितलं की रिफायनरीमुळे आंबे धोक्यात येतील. तसेच मासेमारी व्यावसाय बुडेल", असा खोटा प्रचार केल्याचा आरोपही ठाकरे यांच्यावर यावेळी फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis
Arjun Khotkar : मराठवाडा वाॅटर ग्रीडला तत्वतः मान्यता ; खोतकरांनी टायमिंग साधले..

दरम्यान केंद्र सरकारनं हा प्रकल्प इतर तीन राज्यात विभागून करण्याचा विचार करीत होतं. आता भराडी देवीच्या कृपेने सरकार बदललं, त्यानंतर लगेच हा प्रकल्प इथंच ठेवण्याचा निर्णय घेतला, अशीही माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com