Baramati Politics|भाजपचं मिशन 45 ; सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यामागे अशी आहे रणनीती

Baramati Politics| Nirmala Sitaraman| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत.
Baramati Politics| Nirmala Sitaraman|
Baramati Politics| Nirmala Sitaraman|

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत अनेक राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपने (BJP) विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच पार्श्वभूमीवर 16 ते 18 ऑगस्ट हे तीन दिवस निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहे.

तर तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा 11 ते 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यामागेही भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

Baramati Politics| Nirmala Sitaraman|
Shrikant Deshmukh : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या देशमुखांना तूर्त दिलासा

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन एक महिना उलटला. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचा त्यांचा हा गंभीर प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

पक्षाच्या मिशन 45 चा एक भाग म्हणून, भाजपने सीतारमण यांना बारामतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची प्रमुख भूमिका सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सुरुवातीला, सीतारामन 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील आणि त्यानंतर बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर विधानसभा मतदारसंघात विस्तृत दौरा करतील. या काळात त्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवादात्मक बैठका घेतील आणि पक्ष संघटनेच्या बूथनिहाय स्थितीचा आढावा घेतील.

Baramati Politics| Nirmala Sitaraman|
`नितेश राणे हे पालकमंत्री बनणार! म्हणूनच...`

भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याची तयारी पाहता माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे आमदार राम शिंदे, राहुल कुल यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची ९ ऑगस्टला बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एमव्हीए सरकार स्थापन करण्याचा करिष्मा शरद पवारांनी केला होता. त्यामुळे भाजप अजूनही बुचकळ्यात पडलेला आहे. त्यामुळे पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातत राजकीयदृष्ट्या कमकुवत करायचे आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. त्यांपैकी १० मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. यात बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com