BJP News: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 'मोदी@9' अभियान; आमदार अश्विनी जगतापांनी सांगितले भाजपच्या यशाचे गमक

MLA Ashwini Jagtap : आमदार जगतापांनी पदाधिकाऱ्यांबरोबर केला घरचा टिफीन शेअर
MLA Ashwini Jagtap
MLA Ashwini JagtapSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून 'मोदी@9' हे अभियान सध्या सुरु आहे. त्याच्या शेवटच्या टप्प्यात चिंचवड विधानसभेची टिफीन बैठक झाली. त्यात पक्षाच्या यशाचे गमक स्थानिक आमदार अश्विनी जगताप यांनी सांगितले.

भाजप हा फक्त पक्ष नसून एक परिवार असून तेच पक्षाच्या यशाचे गमक आहे, असं आमदार जगताप म्हणाल्या. त्यातूनच भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झाल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारची मागील नऊ वर्षातील कामे पोहचविण्याचे हे 'मोदी@9' अभियान 1 जूनपासून देशभर सुरु झालेले आहे. त्याच्या शेवटच्या टप्यातील चिंचवड भाजपची टिफीन बैठक बुधवारी सांगवीत झाली.

MLA Ashwini Jagtap
Pimpri-Chinchwad: दोन दिवसांत दोन राजकीय खुनांचे कट उघड; निवडणुकीच्या तोंडावर अघटीत घडण्याची शक्यता

'मोदी@9'चे चिंचवड विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे, पिंपरी महापालिकेतील माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, हर्षल ढोरे, सागर आंघोळकर, शेखर ओव्हाळ, अश्विनी चिंचवडे, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, तसेच मधुकर बच्चे यांच्यासह जिल्हा व मंडल पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख त्यात सहभागी झाले होते.

त्यांनीच नाही, तर आमदार जगतापांनीही या बैठकीसाठी घरून जेवणाचे डबे आणले होते. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले.

MLA Ashwini Jagtap
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन

उद्योगनगरीतील तीनपैकी भोसरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार (महेश लांडगे आणि अश्विनी जगताप) आहेत. तेथे आज ही टिफीन बैठक झाली. तर, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या शहरातील पिंपरी या तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात मात्र, ती अगोदरच घेण्यात आली आहे.

उद्या 'मोदी@9' मोहिमेची सांगता होणार आहे. त्यानंतरच शहर भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. कारण 'मोदी@9' महाजनसंपर्क अभियानामुळेच पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्षपद नियुक्तीच नाही तर राज्यातील विविध ठिकाणच्याही नियुक्त्याही रखडलेल्या आहेत.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com