By Election : चिंचवडमध्ये भाजपचा विजय हा त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभवच; राष्ट्रवादीची पराभवानंतर प्रतिक्रिया

NCP : महाविकास आघाडीने ही निवडणूक एकदिलाने लढविल्याने मतांची आकडेवारी वाढली
Chinchwad By Election Result
Chinchwad By Election ResultSarkarnama

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप विजयी झाली. पण, हा विजय म्हणजे त्यांचा नैतिक पराभव आहे, अशी प्रतिक्रिया या निवडणुकीत पराजय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.

साम, दाम, दंड, भेदासह सत्तेचा गैरवापर, पैशांचा महापूर करूनही भाजपला 2019 च्या तुलनेत 15 हजार मते कमी पडली. तर विरोधातील मतांमध्ये 30 हजारांची वाढ झाली. त्यामुळे भाजपचा चिंचवडमध्ये नैतिकदृष्ट्या पराभवच झाला आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

Chinchwad By Election Result
Ravindra Dhangekar : नाथाचीवाडीतील मातीत बालपण गेलेले धंगेकर चौथे आमदार

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना मिळालेली मते लक्षणीय आहेत. त्यांच्या आणि बंडखोर उमेदवाराच्या मतांची बेरीज केल्यास ती विजयी अश्विनी जगताप यांच्यापेक्षा अधिक होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गतवेळच्या निवडणुकीपेक्षा 9 हजारांनी मतदान अधिक झाल्यानंतरही भाजपला कमी पडलेली मते म्हणजे जनतेचा कौल हा त्यांच्या विरोधातील आहे, असे ते म्हणाले.

प्रचाराच्या शेवटच्या तीन-चार दिवसांत भाजपने लोकशाही धुळीस मिळविण्याचे काम केले. आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत दहशत निर्माण केली.

शिवसेनेच्या शहराध्यक्षांना मारहाण केली. त्यानंतरही काटेंनी एक लाख मते मिळविल्याने पुढील प्रत्येक निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे, असा दावा गव्हाणेंनी केला.

Chinchwad By Election Result
Devendra Fadanvis; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पुर्नविकासाचा सरकारचा प्रस्ताव!

महाविकास आघाडीने ही निवडणूक एकदिलाने लढविल्याने मतांची आकडेवारी वाढली. एकास एक अशी लढत झाली असती तर विजय आमचाच झाला असता, असे ते म्हणाले.

या निवडणुकीत सुरु झालेली भाजपची घसरण कायम राहील आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचेच नगरसेवक अधिक निवडून येतील व महापालिकेत सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com