Bopdev Ghat Gang Rape : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट ; पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या!

Bopdev Ghat Gang Rape Case Update : उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी त्याला अटक केली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News: पुण्यातील बोपदेव घाटात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी त्याला अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील एका आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे आणि तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरूणीवर कोयत्याने धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना 3 ऑक्टोबरला घडली होती. मित्राचे हात शर्टनं तर पाय बेल्टने बांधून तिघा नराधमांनी हे कृत्य केले होते.

Pune Crime News
Bopdev Ghat Case : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी एकाला अटक; दोघांचा शोध सुरू

गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे आहे. तर यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. १५) पोलिस(Police) कोठडी सुनावली आहे. याशिवाय शेख व कनोजिया यांच्याबरोबर असलेल्या त्यांचा आणखी एका साथीदाराचा पोलिस अद्यापही शोध घेत आहेत.

तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती. चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Pune Crime News
Gang Rape : मोठी बातमी! बोपदेव घाटात तरुणीवर तिघांकडून अत्याचार

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. तसेच, पुणे जिल्ह्यातील घाट तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून ६० पथके तयार करण्यात आली होती. बोपदेव घाटामार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com