पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना 3 ऑक्टोबरला घडली होती. मित्राचे हात शर्टनं तर पाय बेल्टने बांधून तिघा नराधमांनी हे कृत्य केले होते. घटना घडल्यानंतर आठ दिवस झाले उलटले तरी पोलिसांच्या हाती आरोपी लागत नव्हते. मात्र, यातील एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
येवलेवाडी परिसरातील एका मद्याच्या दुकानात मद्य खरेदी करताना तीन संशयित सीसीटीव्हीत कैद झाले होते. या सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यातून एकाला अटक केल्याची माहिती आहे. दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकं घडलं काय होतं?
पीडित तरूणी मुळची गुजरात येथील आहे. ती शहरातील एका महाविद्यालयात इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते, तर तिचा मित्रा जळगावचा आहे. तो ‘सीए’च्या अभ्यासक्रमाला आहे. मित्रांच्या मार्फत दोघांचा परिचय झाला होता. गुरूवारी ( 3 ऑक्टोबर ) सायंकाळी हा तरूण तिच्या सहकारी तरूणीसह एका क्लायंटकडे गेला होता. तेथून परत येत असताना त्याला पीडित तरूणीचा फोन आला. त्यानंतर हे दोघे भेटले आणि दुचाकीवरून बोपदेव घाटात आले. या तरूणीला घाटावरून पुणे शहर रात्रीला कसे दिसते, हे पाहायचे होते. रात्री अकराच्या सुमारास तरूण आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते.
काही वेळानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना शस्त्राच्या सहाय्यानं धमकावलं. तरूणीच्या मित्रानं आरडाओरडा करू नये, म्हणून त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरूणीच्या मित्राचा शर्ट आरोपींनी काढला. त्याने त्याचे हात बांधले आणि पॅन्टच्या बेल्टने त्याचे पाय बांधून त्याला एका झाडाला बांधले. हा प्रकार पाहून तरूणी घाबरली. आरोपींनी तिलाही शस्त्राच्या धाक दाखवून मारहाण केली. नंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. याप्रकारानंतर आरोपी तेथून फरार झाले. तरूणीनं कसेबसे स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. मित्रानं तरूणीला धीर दिला. यानंतर मित्रांच्या सहाय्यानं तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
याबाबत रूग्णालय प्रशासनानं कोंढवा पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तरूणीच्या मित्राकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. सध्या तरूणीवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून टीम अन् बक्षीस जाहीर...
घटनेनंतर आरोपी सापडत नसल्यानं याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 60 टीम तयार केल्या. आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.