Gang Rape : मोठी बातमी! बोपदेव घाटात तरुणीवर तिघांकडून अत्याचार

Pune Bopdev Ghat Sexual assault on women: तरुणीच्या मित्राने महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी महिलेचा जबाब घेतला गेला असून अजून या प्रकरणी गुन्हा दाखल झाली नसल्याची माहिती आहे.
Rape Case
Rape Casesarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : दोनच दिवसांपूर्वीच पुण्यात दोन लहान मुलींवर बसचालकाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील बोपदेव घाटात तिघांनी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्राबरोबर बोपदेव घाटात गेलेल्या महिलेवर तिघांनी अत्याचार केला.

तरुणीच्या मित्राने तरुणीला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी महिलेचा जबाब घेतला गेला असून अजून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटात गेली होती. त्यावेळी तेथे तीन जण आले. त्यातील एक जणाने आपण मानवअधिकारी संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत येथे येण्यास मनाई असल्याचे सांगत. तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवत महिलेचे अपहरण करत महिलेवर अत्याचार केला.

Rape Case
NCP Vs BJP : कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतही पवारांचा भाजपला 'जोर का झटका'; माजी आमदारानं कमळ सोडलं, तुतारीवर लढणार...?

तरुणीच्या मित्राने महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातील पोलिसांनी या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. मात्र, आता बलात्काराचा गुन्हा पोलिसांकडून नोंदवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणानंतर गुरुवारी रात्री कोंढवा पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव जमला होता.

सुप्रिया सुळेंची कारवाईची मागणी

सोशल मीडियातून या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे.

पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

Rape Case
Sanjay Rathod Video : पालकमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com