Pimpri Chinchwad Congress : काँग्रेसचे दोन्ही गट भिडले; पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची स्थिती नाजूक असतानाच नवा पेच !

Pimpri Chinchwad Congress News : "एक व्यक्ती-एक पद' या पक्षाच्या ठरावानुसार त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर..."
Pimpri Chinchwad Congress News
Pimpri Chinchwad Congress News Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Congress News : काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कैलास कदम यांच्याकडे 'इंटक'चे राष्ट्रीय सचिव तसेच पुणे जिल्हाध्यक्ष अशी इतर दोन पदेही आहेत. त्यामुळे 'एक व्यक्ती-एक पद' या पक्षाच्या ठरावानुसार त्यांना शहराध्यक्ष पदावरून दूर करण्याची लेखी मागणी काँग्रेसच्या उद्योगनगरीतील त्यांच्या विरोधातील गटाने नुकतीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र बैठकीच्या वेळी पुण्यात केली. यानंतर आता कदम समर्थक गट उसळला असून, त्यांनी तक्रार केलेल्या गटाविरुद्धच पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल कारवाई करा, अशी प्रतिमागणी लगेच पटोलेंकडेच केली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pimpri Chinchwad Congress News
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

काँग्रेसमधील या गटबाजीकडेच नाही, तर एकूणच शहरातील पक्ष व पदाधिकांऱ्याकडे प्रदेशच्या नेत्यांचे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षच असल्यामुळे दिवसागणिक शहरात काँग्रेसची स्थिती नाजूक होत चालली आहे. त्यातूनच माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही, तर साठे यांनी त्यानंतर पक्षालाही रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. २००२ ला पिंपरी महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसची १५ वर्षांतच दयनीय अवस्था झाली. नगरसेवकांचा मोठा गट हा राष्ट्रवादीत सामील झाला. त्यामुळे मागच्या टर्मच्या वेळेस २०१७ मध्ये पालिकेत तर काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता.

कदम शहराध्यक्ष झाल्यावर त्यांनी मोठ्या जोमाने काम सुरू केले. त्यातून पक्षाचे खाते या वेळी पालिकेत पुन्हा उघडण्याची आशा वाटू लागली होती. पण, त्यात ही बेदिली पुन्हा आडवी आल्याने पालिकेतील काँग्रेसची वाट आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, कदमांविरुद्ध पक्षाच्याच एका गटाने तक्रार करताच एकनिष्ठांनी लगेचच शहर कार्यालयात परवा बैठक घेतली. या दिशाभुलीला न जुमानता नागरिकांनी काँग्रेसवरील विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Pimpri Chinchwad Congress News
Pankaja Munde News : भाजप ही वडिलांची प्रॉपर्टी हा पंकजाताईंचा गैरसमज आता दूर होईल !

शहर काँग्रेसबाबत काही दिवसांपासून जनतेत संभ्रम निर्माण होईल, दिशाभूल होईल, पक्षाप्रती वेगळी भावना निर्माण होईल आणि एकंदरीतच एकसंध पक्षामध्ये दुफळी माजली असल्याचे चित्र पक्षातील काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक करत असल्याबद्दल या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. स्वतःला एखादे पद मिळावे म्हणून संपूर्ण पक्षाचे, मात्र ते नुकसान करत आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले.

पैशाच्या जोरावर स्वतःला नेते समजणाऱ्या आणि पक्षशिस्तीची ऐशीतैशी करणाऱ्या या काही कार्यकर्त्यांवरच कारवाईची लेखी मागणी पक्षेश्रेष्ठींनी करावी, असे या वेळी ठरले. तसेच, हे तक्रार केलेले पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहत नसल्याने ते अशी तक्रार कशी करू शकतात, अशी विचारणाही या बैठकीत झाली.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com