बैलगाडा शर्यत घ्या, पण बैलाचे शेपटूही पिरगळता येणार नाही! नाही तर...

पहिली बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) कोणी भरवायची यावरून पुणे जिल्ह्यात आता शर्यत लागली आहे.
Bullock Cart Race

Bullock Cart Race

Sarkarnama

Published on
Updated on

पिंपरी : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी सर्वोच्च न्यायालयाने (Supeme Court) तात्पुरती उठवत ही शर्यत भरविण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर पहिली बैलगाडा शर्यत कोणी भरवायची यावरून पुणे जिल्ह्यात आता शर्यत लागली आहे. त्यासाठी आतापर्यंत चार जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आहे. त्यातील दोन शर्यतींच्या बाऱ्या मावळ आणि आंबेगाव तालुक्यात 1 जानेवारीला रंगणार आहेत. मात्र, त्यासाठीच्या 26 अटी पाळताना आयोजकांच्या नाकी नऊ येणार आहेत.त्यात मास्क,सामाजिक अंतरासह किमान उपस्थितीचे बंधन कसे पाळले जाणार हासुद्धा मोठा प्रश्न आहे.

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या बैलगाडा शर्यतीत सहभागी करून घेण्याची अट कसोशीने कशी पाळली जाणार, हा प्रश्न आहे. शर्यतीचा अहवाल चित्रीकरणासह 15 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे. तो केला नाही अथवा एखादी अट पाळली नाही, तर आयोजकांना पुन्हा शर्यत घेता येणार नाही. तसेच त्यांनी सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेले 50 हजार रुपयेही जप्त केले जाणार आहेत. कोरोना नियमांचेही पालन न केल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसारही कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच दंडासोबत गुन्हाही दाखल होऊ शकतो.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी या शर्यतीला दिली आहे,तशीच ती जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आयोजकांना दिली आहे. ती देताना प्रत्येक आयोजकाकडून 50 हजार रुपये सुरक्षा अनामत घेतली आहे. ही शर्यत पार पाडल्यानंतर कुणाची तक्रार आली,तरी ही अनामत जप्त होऊन वर आयोजक अडचणीत येणार हा भाग वेगळा.

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीत झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या 1960 च्या कायद्यात दुरुस्ती करीत 2017 ला अध्यादेश काढला. त्याकरिता नियमावली तयार केली. त्यामुळे या शर्यतीचा मार्ग पुन्हा मोकळा झाला होता. पण, त्यालाही प्राणीप्रेमी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने या शर्यतीवर पुन्हा बंदी आली. ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबरला तात्पुरती उठवली.

<div class="paragraphs"><p>Bullock Cart Race</p></div>
नाराज आमदारांची व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट अन् भाजप नेत्यांची पळापळ

आता भरविल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतींसाठी 2017 ला बनवण्यात आलेली नियमावलीच पुन्हा लागू करण्यात आली आहे. त्यानुसार या शर्यतीतील बैलांना कसल्याच प्रकारची इजा वा त्रास होणार नाही, यासह 26 अटी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आयोजकांवर टाकल्या आहेत. त्यातील काहींचे पालन करणे आयोजकांच्या दृष्टीने दिव्यच ठरणार आहे. कारण त्यांचे पालन केले, तर शौकिनांची मोठी निराशा होणार आहे. या शर्यतीला ध्वनिप्रदूषण न करण्याची अट आहे. तर, लाऊडस्पीकरवरील लाईव्ह कॉमेंट्रीशिवाय ही शर्यत झाल्याचा थरार वाटत नाही. त्या्मुळे भिर्ऱ आणि झाली रे चा आवाज घुमल्याशिवाय ही शर्यत कशी घ्यायची हा प्रश्न आयोजकांना पडला आहे. तसेच ती विनास्पीकर आणि विनाकॉमेंट्री होणार का,याकडे शौकिनांचे लक्ष लागले आहे.

<div class="paragraphs"><p>Bullock Cart Race</p></div>
भाजपला लवकरच मोठा धक्का! पाच आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर

शर्यतीचे बैल व गाडीवान यांची फिटनेस चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. घाटाच्या तथा शर्यतीच्या धावपट्टीला एक हजार मीटरचे बंधन आहे. तसेच ती खाचखळग्याची, उताराची आणि चिखलमय नसावी, अशीही अट आहे. ही शर्यत रस्ता वा महामार्गावर घेतली जाणार नाही. एका दिवसात फक्त तीनच शर्यतीत बैलांना भाग घेता येणार आहे. शर्यतीच्या बैलाला दारू वा इतर अमली पदार्थ दिले जाणार नाहीत, याची दक्षता आयोजकांनाच घ्यायची आहे. तसेच गाडीवानालाही मद्य जवळ बाळगता येणार नाही. घाटाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे अथवा सुरक्षेचे उपाय असणे ही अटही जाचक आहे. दरम्यान, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवतारामुळे 25 टक्के प्रेक्षक क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे. म्हणजे 250 या उपस्थितीच्या कमाल मर्यादेचा नियम पाळावा लागणार आहे. त्याचे पालन करणेही जिकीरीचेच ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com