Ulhas Pawar On Girish Bapat's Demise: गिरीश बापटांच्या आठवणीने उल्हास पवारांना अश्रू अनावर

Former BJP MP Girish Bapat Passed Away: गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Girish Bapat Passes Away :
Girish Bapat Passes Away : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे बुधवारी (29 मार्च) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Ulhas Pawar shed tears at the memory of Girish Bapat)

अशात गिरीश बापट यांच्या आठवणीत काँग्रेस नेते उल्हास पवार प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. '' बापट यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात दबदबा होता. त्यांच्याकडे पुण्याच्या विकासाची दृष्टी होती. आपल्या माणूसकी असलेल्या स्वभावाने अनेक माणसं जोडली. त्यांच्या पत्नीनेही दरवर्षी पंढरपूरची आषाढी वारी पायी चालत केली. मीही माझ्या पत्नी आणि वहिनी असे तिघेही अनेकदा सोबत विठ्ठलाचे दर्शन घेतलं. ते एका विशिष्ट पक्षाचे नेते असले तरी बाकीच्या पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. पुण्याचे प्रतिनीधी म्हणून ते लोकसभेत गेले. तिथेही त्यांनी आपल्या स्वभावाने छाप पाडली. त्यांनी कधीही कुणाशी वैर धरलं नाही.असही त्यांनी सांगितलं.

Girish Bapat Passes Away :
Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

''दीड-दोन महिन्यापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो. अलीकडच्या राजकीय वातावरण अत्यंत द्वेषाचे झाले आहे. ते पाहताना खुप वाईट वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. महिनाभरापूर्वी आम्ही नेहरु स्टेडियमच्या हिरवळीवर बसलो होतो. त्यांनाही आम्ही बोलवलं होतं, पण ते कसे येतील असं वाटलं, पण ते तिथेही त्यांचे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले, असं सांगताना उल्हास पवार यांना अश्रू अनावर झाले.''

Girish Bapat Passes Away :
Girish Bapat News : प्रतिकूल काळात पुण्यात भाजपला वाढवण्यात गिरीषजींचे मोठे योगदान !

दरम्यान, काही दिवसापूर्वी बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. मात्र ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली होती. अशा परिस्थितही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं होतं. तेव्हा त्यांनी भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते. त्यावेळी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. कार्यकर्त्यांमध्ये कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची त्यांची हातोटी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com