Pune News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल ; भाजप कार्यकर्त्यांला मारहाण करण पडलं महागात...

Case Registered Against Sachin Dodke : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे निकवर्तीय म्हणून सचिन दोडेके यांची ओळख आहे.
 Sachin Dodke :
Sachin Dodke :Sarkarnama
Published on
Updated on

Case Registered Against Sachin Dodke : मारहाण, शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे निकवर्तीय म्हणून सचिन दोडेके यांची ओळख आहे.

सचिन दोडके यांच्यासह पाच ते सहा जणांवर मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

 Sachin Dodke :
MNS : राज ठाकरेंचा आधी इशारा, नंतर मुख्यमंत्र्यांचे मानले आभार : काय आहे नेमकं प्रकरण ?

भाजप कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता वारजे भागात असलेल्या आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक भुयारी मार्ग (बोगदा) आहे. त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काम सुरु आहे.

 Sachin Dodke :
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शिंदे सरकारला जाग ; माहीम समुद्रातील अनधिकृत दर्गा पाडणार..

या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. त्यांनी भोसले यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन भोसले यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. याठिकाणी असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com