MNS : राज ठाकरेंचा आधी इशारा, नंतर मुख्यमंत्र्यांचे मानले आभार : काय आहे नेमकं प्रकरण ?

MNS Raj Thackeray On Mahim : हे टि्वट करीत मनसेनं सरकारला टोला लगावला आहे.
Raj Thackeray News, Eknath Shinde News,
Raj Thackeray News, Eknath Shinde News,sarkarnama

MNS Raj Thackeray On Mahim : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मुंबईतल्या माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतपणे मजार बांधली गेल्याचा व्हिडिओ दाखवला होता. या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, तर त्या मजारीसमोरच गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज यांच्या इशाऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार खळबळून जागे झाले, या मजारच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. या कारवाईबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. याबाबत मनसेच्या अधिकृत टि्वट हॅडलवर मुख्यमंत्र्याचे जाहीर आभार मानले .

"मुख्यमंत्री एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अनाधिकृत पसरलेल्या अफजल खानाच्या कबरीचं बांधकाम तोडून ती कबर पुन्हा पूर्वस्थितीत आणली, याबाबत सरकारचं अभिनंदन, " अशा शब्दात राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला या कारवाईची आठवण करुन दिली आहे. हे टि्वट करीत मनसेनं सरकारला टोला लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या कालच्या सभेत स्क्रिनवर माहीमची एक जागा दाखवली. या व्हिडीओत माहीममध्ये भर समुद्रात दर्गा बांधला जात असल्याचं त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणनू दिलं.

Raj Thackeray News, Eknath Shinde News,
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शिंदे सरकारला जाग ; माहीम समुद्रातील अनधिकृत दर्गा पाडणार..

जिल्हाधिकाऱ्यांकडून संबधित बांधकामाची तातडीने चौकशी करण्यात येत आहे. यासाठी सहा जणांचे पथकही बनवण्यात आले आहे. हे माहीमच्या खाडीत हे पथक पोहचलं आहे. पाहणी केल्यानंतर आज हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू होणार आहे. या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

समुद्रातील हे संबंधित अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर आम्ही त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.

यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना संबंधित बांधकाम हटवावं नाहीतर आपण त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशाराच दिला. ठाकरेंच्या इशाऱ्याने जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे.

मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दर्गाच्या ठिकाणी आले होते त्यांनी संपूर्ण दर्गा परिसराची पाहणी केली. हे बांधकाम एक-दोन वर्षांचं नव्हे तर खूप वर्षांपूर्वीचा आहे, असं काही जणाचं म्हणणं आहे.

Raj Thackeray News, Eknath Shinde News,
Raj Thackeray : 'शिवतीर्थ'च्या गॅलरीतून आईनं ऐकलं लेकाचं भाषण..

गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात एकाकडे गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या, असे काल ठाकरे म्हणाले होते.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुंबई मनपाचे आयुक्त, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांना विनंती आहे की, यावर जर समजा तुमची कारवाई होणार नसेल त्यानंतर महिनाभरानंतर काय होईल ते पाहिल्यावर मी सांगेल. हे माहीम आहे, असे राज यांनी काल सभेत सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com