CBI Raid In Pune : बाणेरमधल्या 'ऋतुपर्ण' सोसायटीत ‘सीबीआय’चे अधिकारी पोचले अन् घबाड हाती लागलं !

Pune Additional Divisional Commissioner Anil Ramod : बाणेरमधील या सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी राहतात....
CBI Raid In Pune
CBI Raid In Pune Sarkarnama
Published on
Updated on

Pune : पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या बाणेर गावातील ऋतूपूर्ण सोसायटीत दुपारी एकच्या सुमारास ‘सीबीआय’चे सुमारे 10 ते 12 अधिकारी आले. यामध्ये काही महिला अधिकाऱ्यांच्या समावेश होता. सोसायटीच्या सुरक्षेला न जुमानता या आधिकाऱ्यांनी त्यांनी थेट इमारतीच्या ‘सी’ विंगमधील चौथ्या मजल्यावर जात रामोड यांच्या घराचा ताबा घेतला.घराचा दरवाजा लावून घेत त्यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ‘सीबीआय’(CBI)च्या आधिकाऱ्यांचा ताफा बाणेरमधील ऋतुपर्ण सोसायटीच्या प्रवेशद्वारात आला. सरक्षा यंत्रणेला न जुमानता त्यांनी थेट ‘सी’ विंगमधील रामोड यांच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट गाठला. घरात जाताच दरवाजा लावून घेतला.

सोसायटीचे सुरक्षा व्यवस्थापक तातडीने त्या ठिकाणी गेले. मात्र, महिला आधिकाऱ्याने दरवाजा उघडला व तपासणी सुरू आहे. तुम्ही थोड्या वेळाने या असे या आधिकाऱ्याने सुरक्षा व्यवस्थापकास सांगितले.

CBI Raid In Pune
Chitra Wagh Vs Jitendra Awhad : चित्रा वाघ-जितेंद्र आव्हाड ट्विटरवर भिडले; ‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’ सगळंच चव्हाट्यावर आलं

अधिकाऱ्यांनी एकाचवेळी रामोड यांचे पुण्या(Pune)तल्या विधान भवानातील कार्यालय तसेच क्विन्स गार्डन येथील सरकारी निवास्थान व बाणेर येथील घरावर छापा घातला. रामोड हे सुमारे दोन वर्षांपासून पुण्यात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.त्यांच्याबाबत लाचखोरीच्या आलेल्या तक्रारीनंतरही आज अचानक ही कारवाई करण्यात आली.

CBI Raid In Pune
Jayant Patil On Death Threat : शरद पवारांना आलेल्या धमकीवर जयंत पाटील म्हणाले, 'हे चाळे कोण करतंय ते सगळ्यांना..'

बाणेरमधील या सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी राहतात. विशेषत: राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनेक आधिाकाऱ्यांचा निवास या सोसायटीत आहे. परिणामी या सोसायटीत नेहमीच व्हीआयपींचा वावर असतो. मात्र, आज दुपारी अचानक अनेक मोटारीतून सीबीआयचे अधिकारी आले. त्यांनी सोसायटीच्या कोणत्याच यंत्रणेला न जुमानता अनिल रामोड(Anil Ramod) यांच्या घराचा ताबा घेतला. त्यामुळे काहीवेळ सोसायटीत गोंधळा उडाला नेमके काय सुरू आहे. याचा अंदाज कुणालाच नव्हता. सीबीआयने रामोड यांच्या घरात छापा टाकल्यानंतर काहीवेळातच पोलिसांनी पैसे मोजण्याचं मशीन मागवलं असल्याची माहिती समोर येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com