Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील ‘ट्विटर वॉर’चा भडका उडला आहे. दोघांकडून शेलक्या शब्दांत एकमेकांचा उद्धार केला जात आहे. एकमेकांची उणीदुणी काढताना गर्भित इशारेही दिले आहेत. त्यामुळे आव्हाड-वाघ यांच्यातील ट्विटरवॉर कुठपर्यंत जाणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Chitra Wagh and Jitendra Awhad broke out on Twitter)
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. अन्यथा काही तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं. हे सगळं ठरवून केलं जातंय, हे जनताही पाहतेय.
सर्वज्ञानी संजय राऊत (Sanjay Raut) आणि जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा, ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल, असेही वाघ यांनी म्हटले आहे.
सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली...आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय. अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ यांच्या ट्विटला जितेंद्र आव्हाड यांनीही प्रत्युतर दिले. ते म्हणाले की, ताई मी कुठलीही शिवी दिली नाही...फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे....तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम मै सब नंगे है.... Baपू आर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना....ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन....एंटी चैम्बर … मधले ‘विनोद’…. आत्ता बस
आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता … माझा स्वभाव आपल्याला माहित आहे…मी सहन करतो … पण मला त्यांनी बोलावे, ज्याचे हात स्वछ आहेत.... अजून खूप बोलू शकतो.... बहिणीला संभाळून घेत आलो ....पण…
आव्हाड यांच्या उत्तरानंतर मात्र चित्रा वाघ यांनी खरमरीत भाषेत एकेरीत उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, ...म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं, तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय.
बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्यासारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली, हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता, तेव्हा माझा संघर्ष सुरू होता, असे वाघ म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत, हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की, हत्या केली तुम्ही, त्याचीही चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही, पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये, तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील..
मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ...तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं… ...आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव, असे आव्हान वाघ यांनी आव्हाड यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.