DSK News Update: डीएसकेंचा पाय खोलात; 590 कोटींच्या अपहारप्रकरणी CBI कडून दोन गुन्हे दाखल

बँकांनी कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यातील ४३३ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे.
DSK News Update:
DSK News Update: Sarkarnama

CBI registered two cases against DSK : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (DSK) यांच्याविरोधात सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहेत.सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात 590 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (CBI registered two cases against builder Deepak Kulkarni (DSK) )

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीएसकेंवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ जुलै २०२० रोजी स्टेट बँकेने दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे पहिला गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय आदी बँकांनी कुलकर्णी यांच्या कंपनीला एकूण ६५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यातील ४३३ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. (Maharashtra Politics)

DSK News Update:
Rahul Gandhi Visits Matoshree : राहुल गांधींचे 'मातोश्री' भेटीच्या चर्चेवरून भाजप मंत्र्यांची टीका; म्हणाले, "त्यांच्या गाठीभेटी..."

तर १ फेब्रुवारी २०२२ रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने दिलेल्या लेखी पत्राच्या आधारे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसकेंच्या समूहाची उपकंपनी असलेल्या डी. एस. के. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च लि. या कंपनीविरोधात दाखल करण्यात आला आहे. या कंपनीने अंदाजे १५६ कोटी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. ही कंपनी डिझायनिंग, गेमिंग, ॲनिमेशन आदींचे प्रशिक्षण देणारी ही कंपनी होती.

कंपनीने आपल्या ताळेबंदात नमूद केल्या प्रमाणे, कंपनीच्या उत्पन्नातील 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करण्यात आली आहे.मात्र, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात कोणत्याही नोंदी झाल्याने आढळून आलेले नाही. ज्या उद्देशासाठी कंपनीला कर्ज दिले होते त्याऐवजी कंपनीने कर्जातून मिळालेली रक्कम मूळ कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे तपासात आढळून आले आहे.

इतकेच नव्हे तर स्टेट बँकेने केल्या फोरेन्सिक ऑडिट मध्ये कंपनीत मोठ्या प्रमाणावर व्हेंडर कंपन्यांसोबत त्यांनी पैशांचा व्यवहार केल्याचे दाखवण्यात आले आहे. पण ज्या कंपन्यांना त्यांनी हे पैसे दिल्याचा दावा केला, त्या कंपन्यांचा पत्ता देखील डी.एस.कुलकर्णी यांच्या कंपन्यांचा असल्याचे तपासात निष्पन्न  झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com