Dr. Narendra Dabholkar Case: 'सीबीआय'च्या तत्कालीन तपास अधिकाऱ्यांचा दाभोलकर हत्येप्रकरणी मोठा खुलासा, म्हणाले...

Pune Crime News : डॉ. दाभोलकर यांचे नरेंद्र महाराज व त्यांच्या अनुयायांसोबत वैमनस्य होते का?
Narendra Dabholkar
Narendra Dabholkar Sarkarnama

Pune News:अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची हत्या झाली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आता या घटनेला दहा वर्ष पूर्ण झाली आहे. दाभोलकर हत्येचा खटला पुण्यातल्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. पाच जणांच्या विरोधात या संबंधीचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी न्यायालयात महत्वाचा खुलासा केला आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (CBI) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी मंगळवारी (ता.२२) उलट तपासणीत न्यायालयात महत्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नोंदविली नव्हती असे ते म्हणाले.

Narendra Dabholkar
Narendra Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्येप्रकरणी 'ही' मोठी अपडेट; तपास पूर्ण अन् लवकरच सीबीआय...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर त्यांच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या व घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या बॅलेस्टिक एक्सपर्टला दाखवून याचे शस्त्र कसे असेल, याबाबत विचारणा केली का? ७.६ एमएमच्या गोळ्या कोणत्या शस्त्रातून झाडण्यात होतात? शरीरातील गोळ्यांचा प्रवास कसा झाला? त्यानुसार त्या गोळ्या किती अंतरावरून मारल्या असतील हे बॅलेस्टिक एक्सपर्टला विचारले का? असे विविध प्रश्न सिंग यांना उलटतपासणीदरम्यान बचाव पक्षाकडून विचारण्यात आले. त्यावर सिंग यांनी ‘नाही’ असे सांगितले.

विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सिंग यांची बचाव पक्षाच्यावतीने ॲड प्रकाश साळशिंगीकर यांनी उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर यांचे नरेंद्र महाराज व त्यांच्या अनुयायांसोबत वैमनस्य होते का? असा प्रश्‍न ॲड. साळशिंगीकर यांनी विचारला असता त्यावर सिंग यांनी हो असे उत्तर दिले.(Crime News)

Narendra Dabholkar
PM Modi Sindhudurg Visit: पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; सिंधुदुर्गमध्ये नौसेनेच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

घटनास्थळाजवळ नरेंद्र महाराजांचे कोणी अनुयायी होते का? याबाबत तपास केला का? या प्रश्नावर सिंग यांनी नाही असे सांगितले. याखेरीज, जुलै २०१३ मध्ये बोगस डॉक्टरांविरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील गैरव्यवहारातून त्यांचा खून झाल्याच्या शक्यतेने तपास केला का? या प्रश्नावर सिंग यांनी नाही असे सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी बुधवारी (ता. २३) होणार आहे.

तत्कालीन सीबीआय अधिकारी एस. आर. सिंग यांनी कोर्टात हा संपूर्ण घटनाक्रम कथन केला आहे. डॉ. विरेंद्र तावडे आणि नरेंद्र दाभोलकर(Narendra Dabholkar) यांच्यात वैचारिक मतभेद होते असंही सिंग यांनी सांगितलं. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येला दहा वर्षे उलटली आहेत. या दहा वर्षात आरोपींना अटक झाली आणि खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र निकाल कधी लागणार आणि शिक्षा कधी ठोठावणार हा प्रश्न विचारला जातो आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com