Maval Crime News : मावळातील कायदा आणि सुव्यवस्थेला गुन्हेगारांचे आव्हान; दोन महिन्यात झाला तिसरा खून

Pimpri-Chinchwad Police : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असलेल्या गहूंजेत रविवारी एका तरुणाचा कोयत्याने निर्घूण खून करण्यात आला.
Suraj Kalbhor
Suraj KalbhorSarkarnama

Pimpri-Chinchwad News : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असलेल्या गहूंजेत (ता. मावळ, जि. पुणे) रविवारी (ता.४) एका तरुणाचा कोयत्याने निर्घूण खून करण्यात आला. मावळ तालुक्यात गेल्या दोन महिन्यात झालेला हा तिसरा निर्घूण खून आहे. त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली असून गुन्हेगारांनी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांना आव्हान दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तीन खूनापैकी पहिले दोन राजकीय असल्याने मावळ (Maval) तालुका हादरून गेलेला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या तिन्ही घटनांत कोयत्याचा वापर झाला आहे. कोयता गॅंगच्या या त्रासामुळे मावळवासियांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोयत्याने आज सपासप वार करून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सूरज काळभोर (रा. आकुर्डी, पिंपरी-चिंचवड ) असे आहे.

Suraj Kalbhor
Pimpri-Chinchwad News : ''लोकांच्या कराचा पैसा आमदार विकत घेऊन सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रात वापरला गेला''

त्याचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. गहूंजे येथील सासरवाडीला तो आज गेला होता. तेथील संतोष बोडके यांच्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्या शेतात तो सकाळी फिरायला गेला त्यावेळी त्याच्यावर तिघा-चौघांनी कोयत्याने वार केले. त्यात तो मरण पावला. याबाबत माहिती समजताच ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस (Police) आयुक्त म्हणून विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील व त्यातही मावळातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. तेथे एकामागोमाग एक खून होत आहेत. याअगोदर मावळच नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेला खून हा १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात भरदिवसा झाला होता. या नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचा चौघांनी कोयत्याने सपासप वार करून खून केला होता.

Suraj Kalbhor
Imran Pratapgadi News : अल्पसंख्यांक समाजाच्या अर्थकारणावर आघात करण्याचे भाजपचे षडयंत्र : खासदार इम्रान प्रतापगढी

तर, त्याअगोदरच्या महिन्यात १ तारखेला प्रति शिर्डी शिरगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सरपंच प्रवीण गोपाळे यांचाही असाच खून तिघांनी डोक्यात कोयत्याचे घाव घालून केला होता. या दोन्ही खूनांनी मावळ हादरून गेले होते. त्यातही आवारेंच्या हाय प्रोफाईल खूनात स्थानिक आमदारच आरोपी असल्याने त्याची मोठी चर्चा झालेली आहे. या दोन खूनांतून सावरायच्या आत आज तिसरा खून तशाच प्रकारे मावळात झाला. त्यातून मावळात शेजारच्या मुळशी तालुक्याचा पॅटर्न या खून सत्रांतून सुरु झाल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com