Imran Pratapgadi News : अल्पसंख्यांक समाजाच्या अर्थकारणावर आघात करण्याचे भाजपचे षडयंत्र : खासदार इम्रान प्रतापगढी

Congress News : कृषी पाठोपाठ यंत्रमाग व्यवसाय देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतो.
Imran Pratapgadi News
Imran Pratapgadi NewsSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : कृषी पाठोपाठ यंत्रमाग व्यवसाय देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतो. मुस्लीम समाज बांधवांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर या व्यवसायावर अवलंबून आहे. काँग्रेस सरकारच्या काळात यंत्रमाग कारखानदारांना तीस टक्के अनुदान होते. केंद्रातील भाजपने ते दहा टक्क्यांवर आणले. चार महिन्यांपासून अनुदानही मिळत नाही. यातून अल्पसंख्यांक समाजाच्या अर्थकारणावर आघात करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. आपण याप्रश्‍नी आवाज उठवू. मतदारांनी कॉंग्रेसला साथ द्यावी असे, आवाहन खासदार इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांनी शुक्रवारी येथे केले.

येथील अन्सार जमात खान्याच्या प्रांगणात 'भारत जोडो' बुनकर संमेलनानिमित्त झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अनिस अहमद, वजहात मिर्झा, अनवार अहमद, नसीम अहमद, नासिर खान, इब्राहिम खान, हाजी बब्बू खान, तारीख फारुखी, निजामुद्दीन राहीन, मिल्लत रहमानी, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग, अब्दुल रहमान, डॉ. मंजूर हसन अय्युबी, सुलतान शेख, जमील क्रांती आदी व्यासपीठावर होते.

Imran Pratapgadi News
Pimpri-Chinchwad News : ''लोकांच्या कराचा पैसा आमदार विकत घेऊन सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रात वापरला गेला''

खासदार प्रतापगढी म्हणाले, की भाजप (BJP) हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करुन द्वेषाचे राजकारण करीत आहे. याउलट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चार हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्‍मिर पदयात्रा काढून भारत जोडो-नफरत छोडो हा संदेश दिला. त्याची परिणीती कर्नाटकमधील निवडणुकीत दिसून आली. आगामी काळात मध्यप्रदेश व महाराष्ट्रमध्ये कर्नाटकची पुनरावृत्ती होईल.

कॉंग्रेसने (Congress) अल्पसंख्यांक समाजबांधवांना सन्मान दिला, असे मत व्यक्त करतानाच त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार बनविले. अनेक अल्पसंख्यांक नेत्यांना राष्ट्रपती, मुख्यमंत्री केले असे सांगितले. त्यांनी हाफीज साजिद अश्रफी व मौलाना अब्दुल अहाद अजहरी यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्याची घोषणा केली.

Imran Pratapgadi News
Kalyan-Dombiwli : भाजपा पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा नोंद प्रकरण भोवलं? मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे सक्तीच्या रजेवर

माजी मंत्री अनिस अहमद यांनी आपण नागपूर व औरंगाबाद येथे हज सेंटर सुरू केले. वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पन्नास हजार शिष्यवृत्ती दिली. कब्रस्तानसाठी दहा लाख रुपये निधी दिला. राज्यात बर्ड फ्लूच्या वेळेस शंभर कोटीची मदत दिली. औरंगाबाद व नागपूरहून हजला जाणाऱ्या भाविकांकडून मुंबईपेक्षा ऐंशी हजार रुपये जास्त घेतले जातात. ते बंद करावे यावेळी बेग यांनी मार्गदर्शन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com