Kasba byelection : ब्राम्हण समाजाच्या नाराजीला मिळणार वाट; काँग्रेसकडून रोहित टिळकांच्या नावाचा विचार सुरु...

Rohit Tilak News : कसबा मतदार संघाबाबत काँग्रेसचा अजूनही खल सुरुच...
Rohit Tilak News
Rohit Tilak NewsSarkarnama
Published on
Updated on

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीमध्ये नवीन ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. भाजपने कसबा पोटनिवणुकीत टिळक कुटुंबा ऐवजी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपवर (BJP) ब्राम्हण समाज नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे चित्र होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी काँग्रेसकडून (Congress) उमेदवारीसाठी प्रयत्न केले नाही. मात्र, आता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रोहित टिळक यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याची सूत्रांची माहीती आहे.

Rohit Tilak News
Kasaba By-Election : एक वर्षाचाच कालावधी होता, उमेदवारी मिळाली असती तर बरं झालं असतं...

तसेच रोहित टिळक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या एका गटानेही प्रयत्न सुरु केल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्याची उमेदवारी फायनल असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे रासने आणि धंगेकर यांच्यामध्ये सामना होईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता रोहित टिळक यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांच्या नावावर काँग्रेसमध्ये विचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघापैकी कसबा आणि कोथरुडमध्ये ब्राम्हण समाजाचा मतदार मोठा आहे. मात्र, कोथरुडमध्ये भाजपने मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर आता टिळक कुटुंबात उमेदवारी देण्या ऐवजी रासने यांना संधी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्राम्हण समाज नाराज असल्याचे सांगितेल जात आहे.

आता त्याचाच फायदा काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टिळक कुटुंबातील आणि त्यातच ब्राम्हण उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगितेल जात आहे. जर रासने आणि रोहित टिळक अशी लढत झाली तर टिळक कुटुंबातील उमेदवार असल्याने रोहित यांना सहानुभूती मिळेल, अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. तसेच रोहित टिळक यांनी येथे विधानसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Rohit Tilak News
Kasba by-election : कसब्यात हेमंत रासनेंना उमेदवारी; ब्राम्हण समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसणार का?

दरम्यान, शैलेश टिळक म्हणाले होते ''आम्हाला आशा वाटत होती की, आम्हाला उमेदवारी मिळेल. पण पक्षाने वेगळा विचार करून रासने यांना उमेदवारी जाहीर केले आहे. पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि रासने यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. ब्राह्मणसमाजावर अन्यायाची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे, असे शैलेश टिळक यांनी नमुद केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com