`पवारांना लक्ष घालावे लागले, यावरून तुम्ही समजून घ्या`

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे आव्हान स्वीकारले.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे नुकतेच (ता. १६ व १७ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका (PCMC) निवडणूक तयारीसाठी येऊन गेले. त्यांच्यावर ही वेळ आली, अशी प्रश्नार्थक मुद्रा करत पालिका निवडणुकीत शरद पवार यांना लक्ष घालण्याची वेळ आल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी शनिवारी (ता.२३ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवडमध्ये आश्चर्य व्यक्त केले. पण, आम्ही समर्थ आहोत. असे ते म्हणाले. पवार यांना पालिका निवडणुकीत लक्ष घालावे लागणं याचाच अर्थ पिंपरीत आम्हाला हरवणं सोप्पं नाही, असेही ते म्हणाले.

Chandrakant Patil
शरद पवारांच्या दौऱ्यानंतर पिंपरी राष्ट्रवादी आली अॅक्शन मोडवर, वैद्यकीय निविदेतील घोटाळा आणला समोर

रावेत येथील एका खासगी शाळा इमारतीच्या उदघाटनासाठी पाटील आले होते. त्यानंतर ते मिडियाशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी पालिका निवडणूकीसाठी अजित पवारही आहेत, असे सांगत म्हणजे दोन पवार, मधेमधे रोहित पवार आणि कोल्हेही यांचे लक्ष असते, असे पाटील उपरोधाने म्हणाले. शहरातील भाजपचे दोन्ही आमदार हे हुकूमशाही पद्धतीने पालिकेत हस्तक्षेप करीत आहेत. तसेच, त्यांच्या चुकीच्या कामांचा व गैरव्यवहारांचा फटका आगामी पालिका निवडणुकीत पक्षाला बसणार असल्याची भीती व तक्रार भाजपचेच नगरसेवक तुषार कामठे यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, हे नीट करायला आम्ही समर्थ आहोत. त्याची पवारांनी काळजी करायचे कारण नाही. उलट त्यांना त्याचा आनंद झाला पाहिजे. आमचे आमदार कसे नीट वागतील, आमचे नगरसेवक कसे नीट राहतील, आमचे चारजण गेले, त्यांना जाण्याचा पश्चाताप कसा होईल, हे पाहण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांना एकप्रकारे धमकीचा इशाराच दिला.

Chandrakant Patil
पिंपरी महापालिकेत अवतरले किरीट सोमय्या...

दरम्यान, शहरातील आमदारांनाही सूचक इशारा पाटील यांनी दिला, तेव्हा हे दोन्ही आमदार उपस्थित नव्हते. हा पक्षाचा कार्यक्रम नसून खासगी असल्याने ते हजर नसल्याचे सांगण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी पिंपरी पालिकेच्या स्थायी समिती कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) धाड पडली. त्यावेळी भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षासह चार पालिका कर्मचाऱ्यांना एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. या भ्रष्टाचारावर इकडे न येता किरीट सोमय्या दुसऱ्या गैरव्यवहारांसाठी राज्यभर जातात यावर बोलताना पाटील म्हणाले, सोमय्या मनाचा राजा आहे. तो ठऱवेल, इकडे यायचे की नाही. तो येईलही. पण, एसीबीच्या धाडीवर काय कारवाई करायची ती तुम्ही (राज्य सरकार) करायचीय आणि ती तुम्ही व्यवस्थित करीतही असता, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह आघाडी सरकारला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com