पिंपरी महापालिकेत अवतरले किरीट सोमय्या...

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या (PCMC) कामात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena) केला आहे.
Pimpri Shivsena
Pimpri ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड (PCMC) स्मार्ट सिटीच्या कामात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वीच शिवसेनेने (Shivsena) केला आहे. तशी तक्रार त्यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. तर, काल गुरूवारी (ता.२१ऑक्टोबर) त्याबाबतची कागदपत्रे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना सीबीआय (CBI) चौकशीसाठी दिली. पण, त्याची त्यांनी दखल न घेतल्याने पिंपरी-चिंचवड शिवसेनेने आज (ता.22 ऑक्टोबर) अभिनव आंदोलन केले. भाजप सत्ताधारी पिंपरीच्या महापौर माई ढोरे यांच्या दालनाबाहेर नकली किरीट सोमय्यांना आणून त्यांच्याकडे या गैरव्यवहाराची फाईल चौकशी लावण्यासाठी दिली.

Pimpri Shivsena
पिंपरी पालिकेत भ्रष्टाचार नाहीच,  पुरावे द्या- कारवाई करतोः बापट 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांची कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात गैरव्यवहार झाल्याची शिवसेनेची तक्रार आहे. त्यामुळे त्याची फाईल सोमय्यांकडे देताच त्यांची बोबडी वळली. तोंड बंद झाले, असा आरोप शिवसेनेच्या जिल्हा संघटिका (शिरूर) सुलभा उबाळे यांनी केला. राऊत यांनी पिंपरी स्मार्ट सिटी घोटाळ्याची कागदपत्रे देऊनही त्याची दखल न घेतल्याने शिवसेनेने शुक्रवारी नकली सोमय्यांना थेट पिंपरी महापालिकेत आणले. पिंपरी स्मार्ट सिटी घोटाळ्याची फाईल त्यांच्याकडे सोपवून त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी केली.

शिवसेनेचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष राजेश वाबळे यांनी सोमय्यांचा मुखवटा घालून नकली सोमय्यांची भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनानंतर उबाळेंसह शिवसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, माजी गटनेते राहूल कलाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक अजित गव्हाणे आदींच्या शिष्टमंडळाने महापीलिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यावर सोमवारी चौकशी लावू, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती उबाळे यांनी दिली.

Pimpri Shivsena
निविदांतील तज्ज्ञ लाचखोरीत निलंबित; पिंपरी स्थायीची कोटीची उड्डाणे थांबली

स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेने ३ जुलै २०२१ रोजी पुराव्यांसह लेखी पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते. त्या पत्रातच ठेकेदार कंपनी, अधिकारी आणि भाजप नेत्यांत कसे संगनमत आहे, हे उघड करण्यात आले आहे. वानगीदाखल उदाहरणही या तक्रारीत देण्यात आले आहे. बाजारात १० हजार रुपयांना मिळणारा पाण्याचा मीटर या कंपनीने १ लाख १५ हजार रुपयांना खरेदी केला आहे. असे ९ हजार पाणी मीटर त्यांनी खरेदी केले आहेत. म्हणजे २२ कोटी रुपयांच्या पाणी मीटरसाठी चक्क ११० कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. त्याचे सर्व बील पालिकेने अदा केले आहे. प्रशासनाचाही तोबरा भरल्याने ते सुध्दा या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com