शरद पवारांच्या दौऱ्यानंतर पिंपरी राष्ट्रवादी आली अॅक्शन मोडवर, वैद्यकीय निविदेतील घोटाळा आणला समोर

श्रीकृपासह तीन संस्थामध्ये सत्ताधारी पक्षासह अन्य राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भागीदारी आहे, असा दावा लांडे (Vilas Lande) यांनी केला आहे.
Yogesh Behl & Vilas Lande
Yogesh Behl & Vilas LandeSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या आठवड्यात (ता.१६ व १७ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवडचा दोन दिवसांचा दौरा करून पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना चार्ज केल्यानंतर आता ते अॅक्शन मोडवर आले आहेत. गुरुवारी (ता.२१ऑक्टोबर) एकाच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी भाजप सत्ताधारी असलेल्या पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय निविदेतील गैरव्यवहार समोर आणला आहे. पालिका रुग्णालयांना मनुष्यबळ पुरविण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराने अनुभवाचा खोटा दाखल दिल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) तसेच, माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल यांनी केली आहे.

Yogesh Behl & Vilas Lande
पिंपरी महापालिकेत अवतरले किरीट सोमय्या...

बोगस अनुभवाचा दाखला दिलेल्या श्री कृपा सर्व्हिसेस ठेकेदार संस्थेला महापालिका दरमहा सव्वाकोटी रुपये देते. या कामासाठी नेमण्यात आलेल्या श्रीकृपासह तीन संस्थामध्ये सत्ताधारी पक्षासह अन्य राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भागीदारी आहे, असा दावा लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यममंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. वर्षाला या तीन संस्थांना १४० कोटी रूपये पालिका देणार आहे. बनावट दाखला सादर केला असताना वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी हे काम श्री कृपा संस्थेला दिलेच कसे?, अशी विचारणा लांडे यांनी केली आहे. पालिकेचे काम भागीदारीत करून सत्ताधारी भाजपकडून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची लूट केली जात असल्याने चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षात भाजपने फक्त भ्रष्टाचारच केला असून तो बाहेर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Yogesh Behl & Vilas Lande
''भ्रष्टाचार न करता पिंपरी-चिंचवडमध्ये केलेली दहा जनहिताची कामे दाखवाच''

पालिकेच्या वैद्यकीय विभागातील निविदा प्रक्रियेत खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी बहल यांनी सुद्धा केली. दोन दिवसांपूर्वीच पालिका सभेत सात तास तळ ठोकून बसलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांचे कौतूक केले होते. तर, याच पक्षाचे आमदार अण्णा बनसो़डे यांनीही काल आयुक्तांना जाहीर पाठिंबा दर्शवित त्यांच्या मागे ठाम उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, बहल यांनी पत्रकारपरिषद घेत आयुक्तांना लक्ष्य केले, हे विशेष.

आयुक्तांचा अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर वचक नसल्यानेच पालिकेची बिनधास्त लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. बनावट कागदपत्रे सादर करून पालिका आयुक्तांनाच 'टिकली' मारून जाणाऱ्या बोगस ठेकेदार, भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे कानाडोळा का केला जातोय? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीवर येत्या आठ दिवसांत फौजदारी करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. आयुक्तांनी बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या ठेकेदारास काम दिलेच कसे अशी विचारणा लांडेप्रमाणे त्यांनीही केली. सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्याकरीता त्यांच्या नात्यागोत्यातील व आवडीच्या ठेकेदारांना काम देण्याकरीता प्रशासनाने मिळून केलेला हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचेही बहल ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com