Chandrakant Patil : बारामतीमध्ये बदल होतील, पण...; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

Baramati Lok Sabha final decision: बारामती लोकसभा मतदारसंघात परिस्थितीनुरूप बदल होतील.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Pune Political News: बारामतीतून राष्ट्रवादीला नामशेष करणार, अशी भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या भाजपला आता बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच तडजोड करावी लागते आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी बारामतीच्या जागेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. (Chandrakant Patil on Baramati Lok sabha)

राजकारणात नवनवीन प्रयोग केले जातात. नवीन माणसाला वाव देत त्या माणसाच्या कर्तृत्वाला समोर आणावे लागते. बारामती लोकसभा मतदारसंघात परिस्थितीनुरूप बदल होतील, पण उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी केले. पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात आयोजित कृषी महोत्सव २०२४ च्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil
Loksabha Election 2024 : शरद पवार ॲक्शन मोडवर; शिरूर, बारामती अन्‌ पुणे लोकसभेसाठी आखला विशेष प्लॅन

बारामती (Baramati) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा अजित पवार यांचे नाव पुढे येत आहे. यामुळे भाजप (BJP) रेसमधून बाहेर पडला आहे. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ` राजकारण हे नेहमी प्रवाही असते. पाण्याच्या प्रवाहामध्ये अडसर आला नाही तर ते अतिशय शुद्ध राहते. अडसर आला तर त्याची गटार होते. त्यामुळे राजकारणदेखील प्रवाही ठेवावे लागते आणि तुम्ही जर अडून राहिला तर राजकारण होत नाही. त्या-त्या राज्यात आवश्यकतेप्रमाणे काही राजकीय समीकरणं तयार होतात. पक्षाची आवश्यकता कमी, पण राज्याची आवश्यकता जास्त असेल तर बारामतीमध्ये परिस्थितीनुरूप बदल होतील.'

या कार्यक्रमास महोत्सवाचे आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे पुणे (Pune) दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह बाळासाहेब गावडे, जालिंदर कामठे, वैशाली सणस, स्वप्नील शहा आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना थोडं दमानं घ्यायचं!

जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या समर्थकांनी वासुदेव काळे यांना आमदार करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे केली. त्याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमध्ये (BJP) मागावं लागत नाही. मी स्वतः कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गिरणी कामगाराचा मुलगा आहे. पक्षनेतृत्वाने दोन वेळा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तसेच राज्यात एका वेळी आठ खात्यांचा मंत्री होतो. पक्ष कार्य करीत असताना प्रतिक्रिया न देता पदासाठी थोडं दमानं घ्यायचे असतं. पक्षाकडून कार्यकर्त्याची दखल घेतली जाते आणि योग्य वेळी संधी दिली जाते, असा महत्त्वाचा सल्लाही पाटलांनी काळे समर्थकांना दिला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com