Loksabha Election 2024 : शरद पवार ॲक्शन मोडवर; शिरूर, बारामती अन्‌ पुणे लोकसभेसाठी आखला विशेष प्लॅन

Sharad Pawar Group Meeting : मोदी बागेत बैठक; पुण्यातून 24 फेब्रुवारीला इंडिया आघाडी करणार निवडणुकीसाठी एल्गार
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. या मतदारसंघात दोन्ही गटांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, दोन्ही गट कामाला लागले आहेत. शरद पवारांनी विशेष करून या मतदारसंघासाठी लक्ष घातले असून, निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. पुण्यामध्ये इंडिया आघाडीच्या महामेळाव्याचे आयोजन शरद पवार यांनी पुढील आठवड्यात केले आहे. (Sharad Pawar made a special plan for Shirur, Baramati and Pune Lok Sabha)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व चिन्हासह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी दिल्या आहेत. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. (Loksabha Election 2024 )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Shivsena Convention : शिवसेनेत आता शिवसैनिकांच्या धर्तीवर ‘शिवदूत’; कोल्हापूरच्या अधिवेशनात होणार घोषणा

निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षाचे चिन्ह व पक्षाचे नाव अजित पवार गटाला देऊ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ही पहिलीच मोठी बैठक होती. केंद्रात व राज्यात सुरू असलेली दडपशाही जनता बघत आहे, आपल्याला जनतेपर्यंत पोहोचून त्यांना धीर द्यायचा आहे, जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे, असा विश्वास या वेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

या वेळी पवारांनी प्रत्येक भागातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत अशा परिस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकींना सामोरे जाताना कशाप्रकारे रणनीती आखावी, यासाठी प्रत्येकाला कानमंत्र देत आगामी निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Sharad Pawar
Atpadi Politics : निधी अवघा दोन कोटींचा; श्रेयवाद रंगला सत्ताधाऱ्यांच्या दोन गटांत!

आगामी लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार असून, त्या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी 2024 रोजी इंडिया आघाडीचा मेळावा पुणे शहरात होणार आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार असून, या तीनही लोकसभा मतदारसंघांत ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या मेळाव्यातून करण्यात येणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Sharad Pawar
Breaking News : सुप्रीम कोर्टाचा सरकारला झटका, इलेक्टोरल बॉण्ड योजना बेकायदा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com