ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक; सोलापुरात चार ट्रॅक्टरचे टायर फोडले; कोल्हापुरात वाहतूक रोखली

कारखाना प्रशासन आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची चर्चा फिस्कटली.
sugarcane price Agitation
sugarcane price Agitation Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर/पंढरपूर : ऊस (sugarcane) दरासाठी (FRP) शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापुरात (kolhapur) दत्त डालमिया साखर कारखान्याची, तर सोलापूर (Solapur) जिल्ह्यात सांगोला शेतकरी, पांडुरंग, युटोपीयन आणि सद्‌गुरु या कारखान्यांची वाहतूक आक्रम कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे. त्यामुळे उसदराचा प्रश्न आगामी काळात पेटणार असल्याचे दिसून येत आहे. (Farmers organization aggressive for sugarcane price in solapur & kolhapur)

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. २७ ऑक्टोबर) रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत. त्यानंतर आज दुपारी पंढरपूर- कराड मार्गावर सोनके येथे ऊसाची वाहने अडवून आंदोलन‌ सुरू केले आहे.

sugarcane price Agitation
अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट : अर्ज माघारीसाठी दबाव टाकला; अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीची आयोगाकडून दखल

कोल्हापुरात स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील दत्त डालमिया साखर कारखान्याची ऊस वाहतूक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे.

sugarcane price Agitation
'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

कारखाना प्रशासन आणि संघटना पदाधिकाऱ्यांची चर्चा फिस्कटली. डालमिया कारखान्याने पहिली उचल ३०७५ जाहीर केली आहे. गेल्या वर्षाच्या पेक्षा या वर्षी पहिली उचल कमी असल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जोपर्यंत ३०७५ पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर होत नाही; तोपर्यंत कारखान्याच धुराडं पेटवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

sugarcane price Agitation
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत नाराजीचा लेटरबॉम्ब : आमदार बनसोडेंना डावलले जात असल्याचा आरोप

पंढरपुरात ऊसतोडणी ठप्प

पंढरपूर येथील ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आज ऊस वाहतूक रोखली आहे. सांगोला शेतकरी, पांडुरंग, युटोपीयन आणि सद्‌गुरु या साखर कारखान्याकडे जाणारी उसाची सुमारे ५० वाहने अडवली आहेत. पंढरपूरपासून जवळ असलेल्या सोनके गावात संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी उसाची वाहतूक रोखून धरत आंदोलन केले. बुधवारी रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर चे टायर फोडले आहेत. त्यानंतर आज दुपारी पंढरपूर- कराड मार्गावर सोनके येथे ऊसाची वाहने अडवून आंदोलन‌ सुरू केले आहे.

sugarcane price Agitation
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच खर्गेंनी मोदी-शहांच्या गुजरातमध्ये लक्ष घातले : १२५ उमेदवार केले निश्चित

यंदाच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहिर करावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. कालपासून ऊसदर आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक भागातील शेतकर्यांनी ऊसदराच्या मागणीसाठी ऊस तोडी बंद केल्या आहेत तर काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखली जाते आहे.

sugarcane price Agitation
त्यानंतर मी रामदास कदमांवर बोलायचे सोडून दिले आहे : आदित्य ठाकरेंचा हल्लोबाल

आज पंढरपूर परिसरातील ऊस तोडणीची कामे पन्नास टक्के बंद झाली आहेत. परिणामी कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. ऊसदराची कोंडी फोडावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीचे समन्वयक दीपक भोसले यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com