Chandrakant Patil News : चंद्रकांतदादांचं ठरलं! यंदाही कोथरूडमधून विधानसभा लढवणार?

Kothrud Assembly Election : ... त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथून विधानसभा निवडणूक लढण्याच्या मार्गात कोणताही अडथळा असल्याचं सध्यातरी दिसत नाही.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच इच्छुक नेते मंडळी लागल्याचे पाहायला मिळत आहेत. इच्छुक नेते मंडळींनी आपल्या मतदारसंघातील भेटीगाठी आणि जनसंपर्क वाढवण्याबरोबरच मोठमोठे पोस्टर लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला सुरू केला आहे. या पोस्टरच्या माध्यमातून आपल्या मतदारांसोबतच पक्षाचे वरिष्ठ आणि विरोधी पक्षातील नेत्यांना एक प्रकारे संदेश देण्याचे काम नेत्यांकडून करण्यात येत आहे.

सध्या पुण्यातील कोथरूड परिसरात लागलेल्या पोस्टर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या ठिकाणी सध्या चंद्रकांत पाटील यांचे मोठमोठे पोस्टर झळकताना दिसत आहेत. या पोस्टरमध्ये चंद्रकांत पाटील यांचा मोठा फोटो आहे.

त्याचबरोबर केंद्रातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि राज्यातील महायुतीतील प्रमुख नेते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. याच बरोबर पुण्याशी आणि कोथरूडशी संबंधित असलेल्या खासदार मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) यांचा देखील फोटो या पोस्टर वर दिसून येत आहे.

Chandrakant Patil
Sugar workers march : महायुती आमदारांचा पाढाव अन्..; साखर आयुक्तालयावर धडकताच कामगारांचा इशारा

सोबतच पोस्टरवर मोठ्या अक्षरांमध्ये कोथरूड असं लिहिण्यात आलं आहे. तसेच चंद्रकांत दादा माणसं जोडतात, माणस घडवतात, पूर्णत्वाचा ध्यास घेतात असं देखील लिहिण्यात आला आहे. या पोस्टरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी यंदा देखील आपण कोथरूड मधूनच निवडणूक लढणार आहोत असं घोषित केलं असल्याच्या चर्चा कोथरूड परिसरात रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Chandrakant Patil
NCP Politics : पुण्यात अजित पवार गटाचं दबावतंत्र; भाजपच्या 'या' विद्यमान आमदाराच्या जागेवरच डोळा !

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर मधून निवडणूक लढणार का ? पुण्यातून निवडणूक लढणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या.अखेर त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निश्चित केलं. त्यानंतर त्यांच्यावर बाहेरून आलेला उमेदवार अशी टीका झाली. मात्र गेल्या पाच वर्षात चंद्रकांत पाटील हे बहुतांश करून पुण्यातील कोथरूड येथेच वास्तव्यास असल्याचं पाहायला मिळालं.

तसेच भाजपाकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी प्रबळ दावेदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांच्या गळ्यात यंदा राज्यसभा खासदार पदाची माळ पडली तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) हे लोकसभेचे खासदार झाले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथून विधानसभा निवडणूक लढण्याच्या मार्गात कोणताही अडथळा असल्याचं सध्यातरी दिसत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com