Aji Pawar  Devendra Fadanvis
Aji Pawar Devendra Fadanvissarkarnama

NCP Politics : पुण्यात अजित पवार गटाचं दबावतंत्र; भाजपच्या 'या' विद्यमान आमदाराच्या जागेवरच डोळा !

khadakwasla constituency Aji Pawar NCP VS BJP : लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 21 हजाराचे मताधिक्य मिळाले. मताधिक्याच्या जोरावर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून या जागेवर दावा सांगितला जातो आहे.
Published on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मधील जागा वाटपाबाबत अद्याप तरी कोणताही फाॅर्म्युला पुढे आलेला नाही. त्यामुळे आघाडी आणि युतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या जागांवर दावे-प्रतिदावे करत आहेत. असाच दावा पुण्यातून भाजपाच्या आमदार असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट ) पदाधिकाऱ्यांनी आपला दावा सांगितला आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मागणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली तसेच आपले निवेदन दिले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनित्रा पवार यांना खडकवासला मतदारसंघातून 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हा मुद्दा पुढे करत ही जागा आपल्याला मिळायला हवी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यां कडून करण्यात येत आहे.

याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना भाजप आमदार भीमराव तापकीर म्हणाले, ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला सुटणार हे सूत्र आहे. त्यानुसार ही जागा भाजपचीच आहे. भाजपकडून मला तीनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष पातळीवर जो निर्णय घेण्यात येईल तो निर्णय सर्वस्वी मान्य असेल. या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील एकसंघपणे पुढे जाणे आवश्यक आहे.

Aji Pawar  Devendra Fadanvis
Chandrahar Patil : ठाकरेंसह विशाल पाटलांची दिल्लीत भेट; चंद्रहार पाटील म्हणाले, "आता विधानसभेला..."

मतदारसंघ भाजपकडेच

या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 21 हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना तब्बल 65 हजाराचे तर 2014 च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार महादेव जानकर यांना तब्बल 35000 पर्यंत मताधिक्य मिळालं होते. त्यामुळे हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असून कोणीही दावे केले तरी हा मतदारसंघ भाजपकडेच राहील असा, विश्वास भीमराव तापकीर यांनी व्यक्त केला.

(Edited By Roshan More)

Aji Pawar  Devendra Fadanvis
Donald Trump : ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण अन् पाकिस्ताननं रचला कट?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com