Pune : भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडीच्या सध्याच्या स्थितीची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीची स्थिती अशी होणार आहे की, 'एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिरा और कोई कहा गिरा' अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेतला.
काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडील जे जे लोक भारतीय जनता पक्षात येतील त्यांच्यासाठी कमळाचे उपरणे तयार आहे. तसेच जे आले आहे त्यांना तर भाजपचे उपरणे टाकले आहेच ना? असं देखील बावनकुळे म्हणाले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अत्यंत चांगले काम करत असून लोकांचा मोदी सरकारवरील विश्वास वाढत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहेत. सरकारमधील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. विरोधकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी समाजात कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी भाजपची आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फर्ग्युसन कॅालेजमध्ये आयोजित पुस्तक महोत्सवाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भेट दिल्यानंतर तिथे आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले.
ते म्हणाले, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला बोलावले, कोणाला नाही यावर वाद घालत बसण्यापेक्षा आणि खेद व्यक्त करण्यापेक्षा खासदार राऊत यांनी 527 वर्षांनंतर राम मंदिर होत आहे, अनेक वर्षे साध्या झोपडीत असलेले रामलल्ला भव्य मंदिरात जात आहेत, स्थापन होत आहेत याचा आनंद व्यक्त करावा त्याचा जल्लोष त्यांनी करावा, असे सुनावले.
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, हे मंत्री छगन भुजबळ यांचे म्हणणे खरेच आहे. ओबीसीवर कोणताही अन्याय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाचा योग्य निर्णय होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा आम्ही लढणार असे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ते लढवतील. जागा वाटपाचा फॉर्मुला ठरल्यानंतर कोण कोणती जागा लढणार हे ठरविले जाईल. भाजपचे पदाधिकारी नवनाथ पडळकर यांची बारामती लोकसभेच्या प्रभारीपदी केलेली नियुक्ती म्हणजे, त्यांना उमेदवारी दिली असे नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. लोकसभेचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार आम्हाला नाही, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.